पुणे : आज काळ असा आहे की कोणत्याही गुजराती व्यक्तीला हिशोब विचारणे शक्य नाही, असा टोला माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी लगावला.
पटेल यांच्या हस्ते ३३ वा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ उद्योजक आणि समाजसेवक नितीन देसाई यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा >>> चिंचवड पोटनिवडणुकीचे मैदान कोण मारणार हे उद्या दुपारी चारपर्यंत होणार स्पष्ट

देसाई यांनी समाज कार्यासाठी देणग्या देताना कधीही हिशोब मागितला नाही, याचा उल्लेख व्यासपीठावरील दिग्गजांनी केला. त्याला उत्तर देताना पटेल म्हणाले, ‘देसाई यांनी हिशोब मागितला नाही, मात्र, आज कोणत्याही गुजराती व्यक्तीकडे कोणीही हिशोब मागू शकत नाही’ पटेल यांच्या या वाक्याने प्रेक्षकांमध्ये खसखस पिकली. पुणे शहर हे केवळ सांस्कृतिक आणि शैक्षणिकच नव्हे तर गेल्या ५० वर्षांपासून राजकारणाचीही राजधानी आणि केंद्रस्थान आहे. असे ते म्हणाले.