लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : ऊसतोडणी मजुरांना ऊस तोडणीच्या मजुरीत ३४ टक्के वाढ आणि मुकादमाच्या दलालीत (कमिशन) एक टक्क्यांनी वाढ करण्यात आली. साखर आयुक्तालयात झालेल्या बैठकीत हा ऊसतोडणी मजूर आणि कारखानदारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पंकजा मुंडे आणि शरद पवार यांच्या लवादाने पुढील तीन वर्षांसाठी हा निर्णय घेतला.

बैठकीला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूचे अध्यक्ष शरद पवार, ऊसतोडणी मजुरांच्या नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, सुरेश धस आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट शिष्यवृत्ती द्या! नितीन गडकरी यांचे चंद्रकांत पाटील यांना पत्र

जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगारांनी ऊसतोडणीच्या दरात ४० टक्के वाढीची मागणी केली होती. तर कारखानदार २९ टक्के दरवाढीवर आडून बसले होते. त्यात समन्वय साधून ३४ टक्के दरवाढ देण्यात आली. ऊसतोड कामगारांची मजुरी प्रति टन २७४ रुपयांवरून ३६७ रुपयांवर जाणार आहे. तर मुकादमांना १ टक्का वाढीव कमिशन मिळणार आहे, मुकादमांना या पूर्वी १९ टक्के कमिशन होते, ते आता २० टक्के होणार आहे. पंकजा मुंडे आणि शरद पवार यांच्या लवादाने या हंगामापासून तीन वर्षांसाठी असणार आहे.

दरम्यान, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचे काम अपेक्षित गतीने पुढे जात नाहीत. त्याबद्दल मी असमाधानी असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या, त्या विषयी आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आणखी वाचा-खरेदीच्या बहाण्याने दागिन्यांची चोरी; दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

राम मंदिर होत असल्याचा मनस्वी आनंद

शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रामा बाबत केलेल्य वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. त्या विषयी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, प्रभू श्रीरामचंद्रविषयी कोण काय बोलले, हे मला माहिती नाही. त्यामुळे त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. परंतु, राम मंदिर होत आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 34 percent price hike for sugarcane workers pune print news dbj 20 mrj
Show comments