पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने ३६ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. निलेश जेधे (रा. नांदेड सिटी, सिंहगड रस्ता), जीवन मागाडे (रा. शिवप्रस्थ सोसायटी, रायगड बिल्डींग, वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या बाबत एकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तक्रारदार व्यावसायिक असून ते धनकवडी भागात राहायला आहेत. आरोपी जेधे, मागाडे यांच्याशी तक्रारदाराची ओळख झाली होती. आरोपींनी त्यांना लिनक्स ट्रेड डाॅट युके या कंपनीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले होते. रक्कम गुंतविल्यास १०० दिवसांत दुप्पट परतावा मिळेल, असे आमिष आरोपींनी त्यांना दाखविले होते. त्यानंतर तक्रारदार आणि त्यांच्या मित्रांनी जेधे आणि मागाडे यांना ३६ लाख १० हजार रुपये गुंतवणुकीसाठी दिले होते.

हेही वाचा – पुण्यातील विविध साहित्यांच्या २० गोडाऊनला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू

पैसे दिल्यानंतर आरोपींना त्यांना परतावा दिला नाही. १०० दिवस उलटल्यानंतर त्यांना मूळ रक्कम परत केली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 36 lakh fraud with the lure of double refund in 100 days pune print news rbk 25 ssb
Show comments