लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : ब्रिटीश गायक ॲलन वॉकर यांच्या संगीत रजनीत (लाइव्ह कॉन्सर्ट) चोरट्यांनी धुमाकूळ घातला. खराडीतील एका मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या रजनीत चोरट्यांनी प्रेक्षकांकडील ३६ मोबाइल संच चोरून नेले. चंदननगर पोलिसांनी मुंबई, हैद्राबादमधील चोरट्यांच्या टोळीला अटक केली.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Marathi actress Mukta Barve special post after appearing in Indrayani serial
‘इंद्रायणी’ मालिकेत झळकल्यानंतर मुक्ता बर्वेची खास पोस्ट, म्हणाली, “कितीतरी दिवसांनी…”
Kartik Aaryan
डिओड्रंटचा वापर करून ‘या’ अभिनेत्याने जाळले होते बहिणीचे केस; आईनेच केला खुलासा
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
tula shikvin changalach dhada akshara life in danger
अक्षराचा जीव धोक्यात; पत्नीला कसा वाचवणार अधिपती? फोनवर किंचाळण्याचा आवाज येताच घडतं असं काही…; पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”

सय्यद महंमद इद्रीस शेख (वय २१, रा. मुंबई), अखिल व्यंकटरमना गोदावरी (वय २४ रा. हैद्राबाद) , लोकेश हनुमंत पुजारी (वय ३१, रा. मुंबई), पप्पु भागीरथी वैश्य (वय २४ रा. मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीतील न्यू इंग्लिश फिनेक्स स्कुलच्या मैदानावर १८ ऑक्टोबर रोजी ब्रिटीश गायक अॅलन वॉकर लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. संगीत रजनीसाठी होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांनीबंदोबस्त तैनात केला होता.

आणखी वाचा-पुणे: फर्ग्युसन रस्ता परिसरातील बंगल्यात चंदन चोरी, बंगला मालकाला दगड भिरकावून मारण्याची धमकी

शेख, गोदावरी, पुजारी, वैश्य यांनी गर्दीत प्रेक्षकांकडील मोबाइल संच चोरले. गर्दीत मोबाइल चोरीच्या तक्रारी पोलिसांकडे आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. संशय आल्याने पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली. त्यांच्याकडून १४ मोबाइल संच जप्त करण्यात आले. याप्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या दोन ते तीन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिली.