पिंपरी शहरातील राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता असलेल्या पिंपरी पालिका निवडणुकीच्या ओबीसी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम शुक्रवारी (२९ जुलै) चिंचवड नाट्यगृहात पार पडला. पालिकेच्या नियोजित १३९ जागांपैकी ओबीसींसाठी ३७ जागा राखीव असणार आहेत. आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर राजकीय पक्षांनी प्रभागनिहाय समीकरण जुळवत मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाट्यगृहात शुक्रवारी सकाळी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सुरू झाला. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांच्यासह निवडणूक विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडतीच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यावेळी राजकीय वर्तुळातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आरक्षणामुळे अनेकांना फटका बसला असल्याचे दिसून येते.

पिंपरी पालिकेच्या निवडणुका तीन सदस्यीय पध्दतीने होणार आहेत. त्यासाठी नव्या रचनेनुसार एकूण प्रभागांची संख्या ४६ असणार आहे. त्यापैकी सांगवी प्रभाग चार सदस्यीय असून इतर ४५ प्रभाग तीन सदस्यीय आहेत. पालिकेची एकूण सदस्यसंख्या १३९ असणार आहे. त्यात पुरुष सदस्य ६९ व महिला सदस्यसंख्या ७० राहणार आहे. एका प्रभागाची सरासरी मतदारसंख्या ३७ हजार इतकी असेल. अनुसूचित जातींसाठी २२ जागा राखीव असून त्यापैकी ११ महिलांसाठी राखीव असतील.

अनुसूचित जमातींसाठी तीन जागा राखीव आहेत. त्यापैकी दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत. ओबीसींसाठी ३७ जागा असून त्यापैकी महिलांसाठी १९ जागा आहेत. खुल्या गटासाठी ७७ जागा आहेत. त्यापैकी ३८ महिलांसाठी राखीव आहेत.

पिंपरी महापालिकेचे प्रभागनिहाय आरक्षण

प्रभाग क्रमांक प्रभागाचे नाव अ ब क

१ तळवडे-रुपीनगर-त्रिवेणीनगर ओबीसी सर्वसाधारण महिला खुला

२ चिखली गावठाण – कुदळवाडी अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला, खुला

३ मोशी, बोऱ्हाडेवाडी-जाधववाडी ओबीसी, सर्वसाधारण महिला, खुला

४ मोशी गावठाण-गंधर्वनगरी- ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, खुला

५ चऱ्होली-चोविसावाडी-वडमुखवाडी ओबीसी, सर्वसाधारण महिला, खुला

६ दिघी-बोपखेल अनुसूचित जमाती, सर्वसाधारण महिला, खुला

७ भोसरी सॅण्डविक कॉलनी ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, खुला

८ भोसरी गावठाण-गवळीनगर- ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, खुला

९ भोसरी, धावडेवस्ती- ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, खुला

१० भोसरी, इंद्रायणीनगर-लांडेवाडी- ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, खुला

११ भोसरी, बालाजीनगर अनुसूचित जाती महिला, ओबीसी, खुला

१२ चिखली,घरकुल-नेवाळेवस्ती ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, खुला

१३ चिखली, मोरेवस्ती- ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, खुला

१४ निगडी, यमुनानगर अनुसूचित जाती महिला, ओबीसी, सर्वसाधारण महिला

१५ संभाजीनगर-पूर्णानगर-शाहूनगर ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, खुला

१६ नेहरूनगर-विठ्ठलनगर-यशवंतनगर अनुसूचित जाती, ओबीसी महिला, खुला

१७ संत तुकारामनगर-महात्मा फुलेनगर अनुसूचित जाती, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला

१८ मोरवाडी-अजमेरा कॉलनी-गांधीनगर-खराळवाडी अनुसूचित जाती महिला, ओबीसी, खुला

१९ चिंचवड स्टेशन-मोहननगर-आनंदनगर अनुसूचित जाती महिला, ओबीसी, सर्वसाधारण महिला

२० काळभोरनगर-रामनगर-अजंठानगर अनुसूचित जाती महिला, ओबीसी, सर्वसाधारण महिला

२१ आकुर्डी गावठाण-दत्तवाडी सर्वसाधारण ओबीसी, सर्वसाधारण महिला, खुला

२२ निगडी गावठाण-ओटास्किम अनुसूचित जाती, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला

२३ निगडी, भक्ती शक्ती-वाहतूकनगरी ओबीसी, सर्वसाधारण महिला, खुला

२४ रावेत-किवळे-मामुर्डी अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण महिला, खुला

२५ वाल्हेकरवाडी – अनुसूचित जाती, ओबीसी महिला, खुला

२६ चिंचवडेनगर-बिजलीनगर-दळवीनगर ओबीसी, सर्वसाधारण महिला, खुला

२७ चिंचवडगाव, उद्योगनगर, रामकृष्ण मोरे नाट्यगृह- ओबीसी, सर्वसाधारण महिला, खुला

२८ चिंचवड केशवनगर, श्रीधरनगर – ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, खुला

२९ भाटनगर-पिंपरी कॅम्प-मिलिंनदगर अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला, खुला

३० पिंपरीगाव-वैभवनगर ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, खुला

३१ काळेवाडी-विजयनगर-नढेनगर ओबीसी, सर्वसाधारण महिला, खुला

३२ तापकीरनगर-ज्योतीबानगर अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला, खुला

३३ रहाटणी-रामनगर ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, खुला

३४ थेरगाव, बापुजीबुवानगर-शिवतीर्थनगर अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण महिला, खुला

३५ थेरगाव, बेलठिकानगर-पवारनगर अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण महिला, खुला

३६ थेरगाव, गणेशनगर-संतोषनगर-पद्मजी ओबीसी, सर्वसाधारण महिला, खुला

३७ ताथवडे-पुनावळे अनुसूचित जाती महिला, ओबीसी, खुला

३८ वाकड अनुसूचित जाती, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला

३९ पिंपळेनिलख-वाकड अनुसूचित जाती, ओबीसी महिला, खुला

४० पिंपळे सौदागर ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, खुला

४१ पिंपळेगुरव गावठाण-वैदुवस्ती-जवळकरनगर अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, खुला

४२ कासारवाडी-फुगेवाडी ओबीसी, सर्वसाधारण महिला, खुला

४३ दापोडी अनुसूचित जाती महिला, ओबीसी, खुला

४४ पिंपळेगुरव-काशीद नगर-मोरया पार्क अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती महिला, सर्वसाधारण महिला

४५ नवी सांगवी ओबीसी, सर्वसाधारण महिला, खुला

४६ जुनी सांगवी अनुसूचित जाती, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, खुला

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 37 out of 139 seats for obcs in pimpri municipal elections pune print news amy