लोणावळा : पर्यटन नगरी असलेल्या लोणावळ्यात गेल्या २४ तासात तब्बल विक्रमी ३७० मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. १४.५७ इंच पाऊस धो- धो बरसला आहे. आधीच मुसळधार पावसाचा इशारा देत लोणावळ्यात आज आणि उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चालू वर्षाचा एकूण २९७१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे ही वाचा… पुण्यात कोसळधारा: ३८ ठिकाणी झाडे कोसळली

हे ही वाचा… पिंपरी : शहरातील शाळा बंद, आपत्कालीन यंत्रणेने दक्ष राहण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस जास्त कोसळत असल्याचे बघायला मिळत आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी केवळ १३५ मिलिमीटर पाऊस लोणावळ्यात कोसळला होता. यावर्षी मात्र उलट चित्र बघायला मिळत आहे. गेल्या २४ तासात तब्बल ३७० मिलिमीटर म्हणजे १४.५७ इंच इतका पाऊस कोसळला आहे. लोणावळा परिसरात अतिवृष्टीचा इशारा देत आज आणि उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. लोणावळा परिसरातील भुशी धरण, इंद्रायणी नदी, छोटे- मोठे तलाव हे देखील ओसंडून वाहत आहेत. भुशी धरणावर पर्यटकांनी जाऊ नये असा आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. लोणावळ्यात विक्रमी पाऊस झाला असून भुशी धरणाच्या पायऱ्यावर मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह वाढला आहे.