लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील ३९४ पोलिसांना गणपती पावला आहे. गणरायाच्या आगमनाच्या दिवशी ३९० जणांना पोलीस शिपाई, नाईकपदावरुन हवालदार, तर चार अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती मिळाली आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी प्रसृत केले.

Vasind police station, three employees Suspension,
वासिंद पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्याचे निलंबन, तरुणाच्या मृत्यूनंतर ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Kolhapur bandh marathi news
Kolhapur Bandh: हिंदू समाजाने पुकारलेल्या कोल्हापूर बंदला प्रतिसाद
criminal murder pune, criminal murder by bouncer,
पुणे : मद्यालयातील बिलाच्या वादातून बाऊन्सरकडून सराइताचा खून, सिंहगड रस्ता भागातील घटना
robbery, mumbai, people arrested robbery,
दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक, तिघे पळाले
Mumbai, Oshiwara police, Oshiwara Police Recover 35 Tolas of Gold ,Jogeshwari, Vasai, gold jewellery, private taxi, CCTV footage, Ulhasnagar, jewellery recovered,
मुंबई : खासगी टॅक्सीत विसरलेले २५ लाखांचे दागिने पोलिसांनी मिळवून दिले
thane police send notice to mns leader avinash jadhav
ठाणे : मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांची नोटीस
Rumors, terrorists, Kamla Nehru Hospital, pune city, latest news, pune police
पुणे : कमला नेहरू रुग्णालयात दहशतवादी शिरल्याची अफवा, मध्यभागात घबराट

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला पाच वर्षे झाले तरी मनुष्यबळाची कमतरता आहे. पोलीस शिपाई पदासाठी दोनवेळ्या भरती झाली. इतर जिल्ह्यांतून बदलीवर येणारे, पोलीस भरतीमधून मिळालेल्या पोलिसांची मोट बांधून आयुक्तालयाचा गाडा हाकला जात आहे. विविध सण, अतिमहत्वांच्या नेत्यांच्या दौ-यावेळी आयुक्तालयाला बाहेरून अधिकची कुमक मागवावी लागते. बंदोबस्तासह घडणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासासाठी देखील राखीव मनुष्यबळ ठेवावी लागते.

आणखी वाचा-काम करण्यास महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची टाळाटाळ… ‘हे’ आहे कारण

त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी ३९४ जणांना बढती दिली. पोलीस दलात २५ मे २००४ पूर्वी रुजू झालेल्यांना सेवाज्येष्ठतेनुसार बढती मिळाली आहे. पोलीस शिपाई आणि नाईक पदावरून ३९० जणांना हवालदारपदी, तर पोलीस दलात ३० वर्षे सेवा पूर्ण करणारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर किमान तीन वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या चार जणांना पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती दिली आहे. मनोज बनसोड, ज्ञानेश्वर पोटे, वाहतूक शाखेतील गजेंद्र जाधवर आणि वाकड पोलीस ठाण्यातील अरुण भालेराव यांना ही बढती मिळाली आहे.

आणखी वाचा-गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यभागात जड वाहनांना प्रवेश बंद

पोलीस नाईक पद रद्द

पोलिसांना पदोन्नती साखळीमध्ये सामान्यतः पोलीस शिपाई-पोलीस नाईक-पोलीस हवालदार-सहायक पोलीस उपनिरीक्षकासह तीन पदोन्नतीच्या संधी मिळतात. सर्वसाधारपणे एका पदावर दहा वर्षे सेवा कालावधी झाल्यानंतर पदोन्नती मिळते. पोलीस शिपाई पदावर भरती झालेल्यांना पोलीस उपनिरीक्षक होण्यासाठी वयाच्या अडचणी येतात. त्यामुळे त्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न अपूर्णच राहते. त्यासाठी पोलीस दलातील पदोन्नती साखळीतील पोलीस नाईक हे पद गृह विभागाने रद्द केले. सध्या कार्यरत असलेले पोलीस शिपाई, नाईक या दोन्ही संवर्गातील पोलिसांना हवालदार पदावर बढती दिली जात आहे.