लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: बाणेर परिसरातील एका क्लिनिकमध्ये डॉक्टरची नजर चूकवून अमेरिकन डॉलर आणि रोकड असा ४ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल असलेली बॅग चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रितेश शहा (४५, रा. बालेवाडी फाटा, बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, शहा यांचे बाणेर परिसरातील ऑर्चिड स्कूलशेजारी श्रद्धा पॉलिक्लिनिक नावाचे हॉस्पिटल आहे. शहा हे हॉस्पिटलमध्येच होते. यावेळी त्यांच्या बॅगेमध्ये ४ लाख ८२ हजार रुपयांचे अमेरिकन डॉलर आणि रोकड होती.
हाेही वाचा… पिण्याच्या पाण्याचा अपव्यय केल्यास नळजोड तोडणार; पिंपरी- चिंचवड महापालिकेचा इशारा
त्यांची नजर चूकवून कोणीतरी त्यांची बॅग लांबविली. बॅग मिळून न आल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार अशोक वणवे तपास करत आहेत.