पुणे : शहर आणि उपनगरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे टँकरच्या मागणीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात (१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४) या कालावधीत टँकरच्या तब्बल ४ लाख ३४८ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीचा विचार करता टँकरच्या फेऱ्यांमध्ये ४६ हजार ९४ एवढी वाढ झाली आहे.

दरम्यान, उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत वाढ होणार असून टँकरच्या फेऱ्यांमध्येही वाढ होणार आहे. त्यामुळे खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्याचे अचूक नियोजन महापालिकेला करावे लागणार आहे.

Economy Growth rate likely to fall to 6 4 percent
अर्थव्यवस्थेची वाढ मंदावणार! विकासदर ६.४ टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Mumbai, Increase in PM 2.5 levels,
मुंबईत पीएम २.५ च्या पातळीत वाढ
Image of Indian economy graphics or related visuals
भारताचा GDP यंदा ६.४ टक्क्यांवर घसरण्याची शक्यता : सरकारचा अंदाज
Bombil , Saranga, low visibility , fish price ,
कमी दृश्यमानतेमुळे मासळीही दिसेनाशी; यंदाच्या वर्षी सरंगा, बोंबिलाच्या दरात ७० टक्क्यांनी वाढ
Work on direct water pipeline from Gangapur Dam begins
गंगापूर धरणातून थेट जलवाहिनीचे काम प्रारंभ, नाशिकचा तीन दशकांचा प्रश्न मार्गी लागणार
2024 hottest year recorded in the world
विश्लेषण : २०२४ आजवरचे सर्वांत उष्ण वर्ष कसे ठरले? २०२५मध्येही हीच स्थिती?
states fund raise loksatta news
कर्ज उभारणीसाठी राज्यांकडून तिमाहीत चढाओढीने बोली शक्य, उसनवारी ४.७३ लाख कोटींवर जाण्याचा, दरही महागण्याचा अंदाज

हेही वाचा…पुणे : बांधकामेही पिताहेत पिण्याचे पाणी, पुनर्प्रक्रिया केलेले पाणी वापरण्यात निकषांचे अडथळे

खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेतूनही शहराच्या पूर्व भागासाठी पाणी घेतले जाते. शहर आणि उपनगराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून सध्या प्रतिदिन १ हजार ६८० ते १ हजार ७०० दशलक्ष लिटर एवढे पाणी घेतले जात आहे. वास्तविक प्रतिदिन १ हजार ४०० दशलक्ष लिटर एवढे पाणी घ्यावे, अशी सूचना राज्याच्या जलसंपदा विभागाने महापालिकेला केली आहे.

धरण साखळी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाणी घेतले जात असतानाही अनेक ठिकाणी पाणीपुरवठा करताना महापालिकेच्या नाकीनऊ येत आहे. आंबेगाव, धायरी, किरकिटवाडी, सूस, म्हाळुंगे, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वाघोली, लोहगाव या महापालिका हद्दीतील समाविष्ट भागाला विस्कळीत आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. याच भागातून पाण्याची सर्वाधिक मागणी असून ती दिवसेंदिवस वाढत आहे. याशिवाय मध्यवर्ती भागांतही विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याच्या शेकडो तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. त्यामुळे तक्रारी येणाऱ्या भागालाही टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.

हेही वाचा…पिंपरी : जमीन मोजणीला विरोध करत तीन महिलांचा पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

महापालिकेकडून साधारणपणे १५० ते १६० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये महापालिकेच्या मालकीचे २० टँकर्स असून उर्वरीत टँकर ठेकेदारांचे आहेत. मागणीनुसार या सर्व टँकरद्वारे दिवसाला साधारपणे शंभरच्या आसपास फेऱ्या होत आहेत. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत सुमारे एक लाखांपेक्षा जास्त फेऱ्या झाल्या आहेत. टँकरच्या फेऱ्यांची ही मागणी येत्या काही दिवसांत वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा…पिंपरी : निघोजे बंधाऱ्याला गळती…पिंपरी-चिंचवडमधील समाविष्ट गावांत पाण्याचा प्रश्न

तीन वर्षांतील टँकरच्या फेऱ्या

वर्ष टँकरच्या फेऱ्या

२०२१-२०२२ ३०६८४२
२०२२-२०२३ ३५४२५४

२०२३-२०२४ ४००३४८

Story img Loader