कांद्याच्या भाववाढीने अस्मान गाठले असताना, कांद्यावरून वांदे होण्याची अनेक प्रकरणे उजेडात येत आहेत, त्यातच, िपपरी भाजीमंडईतील कांदेचोरीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेहमी मंडईत भुरटय़ा चोऱ्या होणाऱ्या मंडईत ४०० किलो कांदे चोरीला गेले. या प्रकरणी रविवारी पोलिसांनी तिघांना गजाआड केले. त्यासाठी सीसीटीव्ही फुटेजने महत्त्वाची कामगिरी बजावली.
िपपरी बाजारपेठेतील भाजीमंडईत एका विक्रेत्याचे सुमारे ४०० किलो कांदे अज्ञात चोरटय़ांनी लांबवले होते. त्याआधीही मंडईत नेहमी चोऱ्या होत होत्या. मंडईतील भुरटय़ा चोऱ्या व एकूणच गुन्हेगारीमुळे येथील विक्रेते वैतागले होते. त्यामुळे त्यांनी आंदोलनाचा पवित्राही घेतला होता. त्यातच ४०० किलो कांदे असलेल्या सात पोत्यांच्या चोरीचा प्रकार घडला. रात्री अडीचच्या सुमारास झालेली ही चोरी समोरच्या एका दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली. त्याचा आधार घेत पोलिसांनी तपास केला व तीन संशयितांना अटक केली आहे. पुढील तपास िपपरी पोलीस करत आहेत.
िपपरी भाजीमंडईत ४०० किलो ‘कांदेचोरी’
भाजीमंडईत एका विक्रेत्याचे सुमारे ४०० किलो कांदे अज्ञात चोरटय़ांनी लांबवले.
Written by दया ठोंबरे

First published on: 07-09-2015 at 03:04 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 400 kg onion theft pimpri