लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आठ मतदारसंघांतून ४१ जणांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे.

Vanchit Bahujan Aghadi, Bahujan Samaj Party,
आंबेडकरी पक्षांच्या उमेदवारांचा वेलू गगनावरी !
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sharad Pawar Ajit Pawar fb
“बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही” म्हणणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांचा टोला; म्हणाले…
Supriya Sule comment on BJP, Supriya Sule,
१६३ अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ देऊन रडीचा डाव, खासदार सुप्रिया सुळे यांची भाजपवर टीका
minister chandrakant patil express claim about bjps vote share increasing in loksatta loksamvad
मतदान वाढेल; फायदा भाजपला ; चंद्रकांत पाटील यांचा दावा
Shekhar Shende filed complaint against Dr Pankaj Bhoyer for giving sarees and utensils to women
सरकारी सेवेतील लाडक्या बहिणींना साडी-भांडी; तक्रार होताच आमदार म्हणतात…
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’

विधानसभेसाठीची सार्वत्रिक निवडणूक येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणुकीच्या तयारीत आघाडी घेतली होती. पक्षाचे मजबूत संघटन आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात असलेली इच्छुकांची संख्या लक्षात घेता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इच्छुकांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया २८ ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आली.

आणखी वाचा-उरूळी देवाची, फुरसुंगी गावांवर पुणेकरांचे ५०० कोटी खर्च

त्यासाठी चार सप्टेंबर ही मुदत देण्यात आली होती. मात्र त्याला दहा सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांतून ४१ जणांचे अर्ज आल्याची माहिती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. या सर्व इच्छुकांची मुलाखत घेण्यात येणार असून, त्यानंतर त्यांची नावे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत.