‘टाटा पॉवर- क्लब एनर्जी’ या ऊर्जाबचतीबद्दल जनजागृती करणाऱ्या क्लबचे पुण्यात ९३४ सदस्य झाले आहेत. यांतील बहुसंख्य सदस्य शालेय विद्यार्थी असून क्लबने गेल्या एका वर्षांत जनजागृतीद्वारे तब्बल ४१,१२५ युनिटस् विजेची बचत केली असल्याचा क्लबचा दावा आहे. हे वाचविण्यात आलेले विजेचे युनिटस् ४० टन कार्बन डाय ऑक्साइडइतके आहे, तसेच इतक्या युनिटस्मध्ये वीसहून अधिक घरांना विजेचा प्रकाश मिळू शकतो, असेही क्लबने म्हटले आहे.
क्लबतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत क्लब देशातील ४०० हून अधिक शाळांपर्यंत पोहोचला आहे. ऊर्जेच्या संवर्धनाविषयी जनजागृती व्हावी यासाठी शाळा आणि सोसायटय़ांमध्येही अशा लघु क्लब्सची स्थापना करण्यासाठी क्लबतर्फे प्रोत्साहन दिले जात आहे. राष्ट्रीय स्तरावर ऊर्जेच्या बचतीविषयी प्रश्नमंजूषा, पोस्टर बनविण्याची स्पर्धा, निबंध स्पर्धा घेतल्या जातात. तर, ‘एनर्जी बुक- व्हॉटस् अप विथ एनर्जी?’ या प्रकाशनाद्वारेही जनजागृती करण्यात येते.
‘टाटा पॉवर क्लब एनर्जी’ कडून ४१ हजार युनिट्स विजेची बचत
‘टाटा पॉवर- क्लब एनर्जी’ या ऊर्जाबचतीबद्दल जनजागृती करणाऱ्या क्लबचे पुण्यात ९३४ सदस्य झाले आहेत. यांतील बहुसंख्य सदस्य शालेय विद्यार्थी असून क्लबने गेल्या एका वर्षांत जनजागृतीद्वारे तब्बल ४१,१२५ युनिटस् विजेची बचत केली असल्याचा क्लबचा दावा आहे.
आणखी वाचा
First published on: 12-04-2013 at 01:40 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 41 thousand units electricity saved by tata power club energy