पुणे : दागिने घडविण्यासाठी दिलेले ४२ लाखांचे सोने घेऊन कारागीर पसार झाल्याची घटना उघडकीस आली. सराफ व्यावसायिकांची फसवणूक केल्याप्रकरणी एका कारागिराविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला.रमेश शंकर माईती (सध्या रा. रविवार पेठ, मूळ रा. विष्णूबुराह, मेदनीपूर, पश्चिम बंगाल) असे पसार झालेल्या कारागिराचे नाव आहे. याबाबत सराफ व्यावसायिक मयूर प्रफुल्लचंद्र सोनी (वय ३५, रा. रास्ता पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोनी सराफ व्यावसायिक आहेत.

आरोपी रमेश माईती याला सराफ व्यावसायिक सोनी आणि जाॅयनाथ माईती यांनी ४२ लाख २१ हजार रुपयांचे सोने दागिने घडविण्यासाठी दिले होते. सोने दिल्यानंतर आरोपी रमेशने त्यांना दागिने घडवून दिले नाहीत.सोनी आणि माईती यांनी विचारणा केली, तेव्हा आरोपी रमेश सोने घेऊन पसार झाल्याचे उघडकीस आले. सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड तपास करत आहेत.

Gutkha worth one crore seized in Khed Shivapur toll naka area
खेड शिवापूर टोलनाका परिसरात एक कोटींचा गुटखा जप्त, कर्नाटकातील गुटख्याची पुण्यात विक्री
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
The prices of gold and silver have steadily increased
सोने-चांदी अजून झळकणार की झाकोळणार?
is Dissatisfaction in North Gadchiroli over Sohle Iron Mine
सोहले लोहखाणीवरून उत्तर गडचिरोलीत असंतोष? खाणीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याला…
shocking video
VIDEO : पेट्रोल भरल्यानंतर ग्राहकाने ५०० रुपये दिले नाही, पुढे कर्मचाऱ्याने असे काही केले… व्हिडीओ होतोय व्हायरल
drop in gold and silver prices before Diwali
दिवाळीपूर्वीच सोने- चांदीच्या दरात घट… हे आहे आजचे दर…
ambani family drinks milk of this cow breed everyday
अंबानी कुटुंबीय ‘या’ गायीच्या दुधाचं करतात सेवन, मुंबई नव्हे तर ‘या’ भागातून मागवलं जातं दूध, किंमत किती?
Gold prices today, market
सुवर्णवार्ता! सोन्याच्या दरात प्रथमच घसरण, हे आहेत आजचे दर…