म्युच्युअल फंडात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची १५ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी एकाच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अजित दिनकर मोरे (वय ४२, रा. साईरत्न अपार्टमेंट, नवले पुलाजवळ, आंबेगाव बुद्रुक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>> पुणे : मिळकतकरातून पहिल्या सहा महिन्यात १ हजार ३०४ कोटींचे उत्पन्न

आरोपी मोरे यांनी ज्येष्ठ महिलेशी संपर्क साधला होता. म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले होते.  ज्येष्ठ महिलेने आरोपी मोरेला म्युच्युअल फंडात गुंतवणुकीस १५ लाख रुपये दिले होते. मोरेला पैसे दिल्यानंतर महिलेला कोणत्याही प्रकारचा परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक थोरात तपास करत आहेत.

Story img Loader