गुंतवणुकीवर परतावा देण्याच्या आमिषाने महिलेची ४४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – अमरावती : कुपोषण आणि बालमृत्यूसाठी सर्वच राज्यकर्ते जबाबदार – अजित पवार
या प्रकरणी अण्णा दुराई, कार्तिक अण्णा दुराई (दोघे रा. भद्रावती, कर्नाटक), देवांगभाई महेशभाई रावल (रा. गुजरात) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेची परिचितामार्फत आरोपींशी ओळख झाली होती. आरोपींनी व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखविले होते. कर्नाटकात खणीकर्म व्यवसायात मोैल्यवान धातू सापडत असून धातुला मोठी किंमत असल्याची बतावणी आरोपींकडून करण्यात आली होती. महिलेला व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा देण्यात येईल. ४४ लाख रुपये गुंतविल्यास ५० कोटीपर्यंत परतावा मिळू शकतो, असे आमिष आरोपींनी दाखविले होते.
हेही वाचा – चंद्रपूर : हवाई रुग्णवाहिका धावपट्टीवर आली , पण अंधारामुळे रुग्ण घेऊन न जाताच निघून गेली
आरोपींच्या आमिषाला महिला बळी पडले. महिलेने आरोपींच्या बँक खात्यात वेळोवेळी ४४ लाख रुपये जमा केले. दरम्यान, महिलेने पैसे जमा केल्यानंतर तिला कोणताही परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक रोकडे तपास करत आहेत.