भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणावाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात वास्तव्यास असलेल्या ४५ पाकिस्तानी हिंदूंना गुरुवारी (दि.७) भारताचे नागरिकत्व प्राप्त झाले आहे. पाकिस्तानात त्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागत असल्याने ते बऱ्याच काळापासून भारतात अर्थात पुण्यात वास्तव्याला होते. अनेक प्रयत्नांनंतर भारतीय नागरिकत्व मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


हिंदू समाज हा पाकिस्तानात अल्पसंख्याक आहे. पाकिस्तानात आपल्याला अनेक अडचणींना सामना करावा लागत होता. त्यामुळे भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. अखेर आमच्या प्रयत्नांना यश आल्याने आनंद होत आहे, असे जयप्रकाश नेभवाणी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात या सर्वांना कायदेशीररित्या भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आलं. भारताचं नागरिकत्व मिळाल्यानं सर्वांनी समाधान व्यक्त केल आहे. पाकिस्तानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे भितीपोटी आणि काम-धंद्यानिमित्त हे ४५ जण सुमारे अनेक वर्षांपासून पुणे शहरात वास्तव्याला आहेत. मात्र, त्यांच्याकडे भारताचे नागरिकत्व नव्हते. मात्र, ते मिळावे यासाठी त्यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानंतर या सर्वांची मूळ कागदपत्रे तपासून त्यांना भारताचे नागरिकत्व देण्यात आलं.

या लोकांकडे भारताचे नागरिकत्व नसल्याने त्यांना भारतात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. मुळात भारतीय नागरिकत्वचं नसल्याने त्यांना इथल्या सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच रेशन कार्ड, आधार कार्ड यांसारख्या सुविधा मिळत नव्हत्या, तसेच अनेकदा पाकिस्तानी नागरिक असल्याकारणाने त्यांना भाड्याने घर घेतानाही अनेक अडचणी येत.

१९५५च्या भारतीय नागरिकत्व कायद्यात २०१६मध्ये बदल करण्यात आला आहे. या नव्या कायद्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर देशाचे नागरिकत्व प्रदान करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. कधी काळी भारताच्या भूमीचा भाग राहिलेल्या अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशात अल्पसंख्य असणाऱ्या नगिरकत्व देण्याचा अधिकार प्रदान करण्यात आले आहे.