शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी किशोर शंकर चेन्नूर (रा. धनकवडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चेन्नूर याच्याशी तक्रारदाराची गेल्या वर्षी ओळख झाली होती. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो, असे आमिष त्याने दाखविले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तक्रारदार व्यावसायिकासह मित्रांनी चेन्नूर याच्याकडे गुंतवणुकीस रक्कम दिली. व्यावसायिकासह पाच जणांकडून चेन्नूरने ४७ लाख रुपये घेतले. सुरूवातीला त्यांना काही दिवस परतावा दिला. त्यानंतर चेन्नूरने परतावा देणे बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक शेंडगे तपास करत आहेत.