लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : लष्करी रुग्णालयात नोकरीच्या आमिषाने ४९ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

विनायक तुकाराम कडाळे (वय ५३, रा. गंगाधाम फेज दोन, मार्केट यार्ड) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत राजेंद्र काशीनाथ हगवणे (वय ५३, रा. शिवाजी कॉम्प्लेक्स, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हगवणे यांची एका परिचितामार्फत कडाळेशी ओळख झाली होती. वानवडीतील लष्करी रुग्णालयात विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माझी ओळख आहे. नोकरी लावायची असल्यास मला सांगा, अशी बतावणी कडाळेने हगवणे यांच्याकडे केली होती.

आणखी वाचा-Ajit Pawar: विकास कामांच्या बॅनरवरून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांचे फोटो गायब; अजित पवारांच्या कार्यक्रमावरून महायुतीमध्ये धुसफूस?

हगवणे यांची मुलगी आणि नात्यातील काहीजणांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कडाळेने पैसे मागितले. त्यांनी कडाळेच्या बँक खात्यात ३० लाख ६० हजार रुपये जमा केले. कडाळेने नोकरीच्या आमिषाने आणखी काहीजणांकडून १८ लाख ७५ हजार रुपये घेतले. चार वर्षांपासून कडाळेकडे हगवणे आणि तक्रारदार पाठपुरावा करत होते. नोकरी न मिळाल्याने अखेर हगवणे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. कडाळेविरुद्ध यापूर्वी फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 49 lakh fraud with the lure of a job in a military hospital pune print news rbk 25 mrj