पुणे पोलीस दलातील तीन आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील दोन अशा पुण्यातील पाच पोलीस उपायुक्तांचा भारतीय पोलीस सेवेते (आयपीएस) समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्या पोलीस दलात दाखल झालेल्यांनी काही वर्षे सेवा केल्यानंतर राज्य शासनाकडून या अधिकाऱ्यांचा आयपीएस सेवेत समाविष्ठ करण्यासाठी केंद्राकडे शिफारस केली जाते. त्यानुसार सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे, परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त आर. एल. पोकळे, प्रशासन विभागाचे उपायुक्त जे. जे. नाईकनवरे, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त जालिंदर सुपेकर, राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांचा आयपीएस सेवेत समावेश करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा