सिंहगड रस्ता भागात भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील पाच लाख ३० हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत विनायक वडकर (वय ५२, रा. मणीबंध काॅम्प्लेक्स, नित्यानंद हाॅलजवळ, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वडकर कुटुंबीय दुपारी सदनिका बंद करुन बाहेर गेले होते. त्या वेळी चोरट्यांनी दरवाज्याचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी पाच लाख ३० हजारांचे दागिने लांबविले. वडकर कुटुंबीय सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घरी परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार तपास करत आहेत.