आमदारांना ५० कोटींच प्रलोभन दाखवून राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. यावर्षी ५० कोटी आणि पुढच्या वर्षी ५० कोटी अशा प्रकारचं आमदारांना प्रलोभन दाखवण्यात आलं. तसेच, ज्या पद्धतीने गोपीचंद पडळकर अजित पवारांवर टीका करत आहेत, अशा प्रकारे खालच्या पातळीवर जाऊन टीका कुणीही करू नये. व्यक्तिगत टीका करणे चुकीचे आहे. परंतु, एका आमदारामुळं राज्याच्या अध्यक्षाला माफी मागावी लागते हे पक्षाचे (भाजपा) दुर्दैव असल्याचं म्हणत भाजपाला दानवे यांनी टोला लगावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंबादास दानवे म्हणाले, राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांच्या बंगल्यावरून आमदारांना ५० कोटी रुपयांच अभिवचन देण्यात आलं. त्यांना प्रलोभन दाखवून राष्ट्रवादीत बंडखोरी झाली. आमच्यातील काही लोकांनीदेखील अजित पवार निधी देत नाहीत म्हणून बोंब केली. आता तेच पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत आणि कोट्यावधी रुपयांचा निधी घेत आहेत, असेदेखील दानवे म्हणाले.

हेही वाचा – टीईटी गैरप्रकारातील उमेदवारांना शिक्षक भरती प्रक्रियेत संधी

हेही वाचा – पुणे : फिनिक्स माॅलच्या सातव्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू

पुढे ते म्हणाले, शाळांचा खासगीकरणाचा घाट हा मुठभर शिक्षण सम्राटांची तुंबडी भरण्यासाठी सरकारच्या मदतीने केला जातोय. या खासगीकरणामुळे सर्वसामान्यांचा शिक्षणाचा अधिकार हिरावून घेणे चुकीचे आहे. पुढे ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मराठा समाजाची मागणी आहे. परंतु, ५० टक्क्यांवर आरक्षण देता येत नाही. त्यामुळे भाजपाने संसदेत ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी. केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. तरीही मराठा समाजाला भाजपा आरक्षण देत नाही. मराठा आरक्षणावरून त्यांची दुटप्पी भूमिका आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 50 crore lure to mla during ncp rebellion ambadas danve allegation kjp 91 ssb