एखाद्या नाटकाची पन्नाशी नाटकाच्या लेखकासोबत साजरी करण्याचा योग फारच दुर्मीळ असतो. हा योग शुक्रवारी (२२ नोव्हेंबर) जुळून येत आहे. सतीश आळेकर लिखित-दिग्दर्शित ‘महानिर्वाण’ या नाटकाच्या पहिला प्रयोग २२ नोव्हेंबर रोजी झाला होता. या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. या नाटकाचा पहिला प्रयोग पुण्यातील भरत नाट्य मंदिर येथे ‘थिएटर ॲकॅडमी’ या संस्थेने राज्य नाट्य स्पर्धेत केला होता. १९७४ ते २०११ पर्यंत या संस्थेने ‘महानिर्वाण’चे सुमारे चारशेहून अधिक प्रयोग केले. २०१८ पासून या ‘महानिर्वाण’चे प्रयोग आळेकर यांच्याच दिग्दर्शनाखाली पुण्याची ‘नाटक कंपनी’ ही संस्था करत आहे. या नाटकातील अनेक मूळ कलाकार आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. नाटकाचा पहिला प्रयोग झाला तेव्हा नाटकाच्या नव्या संचातील कलाकारांनी जन्मसुद्धा घेतला नव्हता. तरी नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. या पन्नास वर्षांच्या तरुण नाटकाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग शनिवारी (३० नोव्हेंबर) श्रीराम लागू रंग-अवकाश येथे सायंकाळी साडेसात वाजता होणार आहे. त्यापूर्वी सायंकाळी सहा वाजता मूळ संचातील कलाकारांबरोबर गप्पांची पर्वणी अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
‘महानिर्वाण’ने गाठली पन्नाशीची उमर
सतीश आळेकर लिखित-दिग्दर्शित ‘महानिर्वाण’ या नाटकाच्या पहिला प्रयोग २२ नोव्हेंबर रोजी झाला होता. या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-11-2024 at 15:07 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 50 years completed to first performance of play mahanirvan pune print news vvk 10 mrj