पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या ग्रामीण भागात मिळून गेल्या सहा महिन्यांत क्षयरोगाचे एकूण ५,११३ रुग्ण सापडले आहेत, तर यातील २२२ क्षयरुग्णांचा मृत्यू झाला आहे. क्षयरोगाविषयीच्या शासकीय प्रोग्रॅमच्या आकडेवारीनुसार पिंपरी- चिंचवडमध्ये क्षयरोगाच्या मृत्यूंमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
राज्याच्या ‘क्षयरोग कक्षा’तर्फे ही आकडेवारी देण्यात आली. त्यानुसार शहरात या वर्षी जानेवारी ते जून या कालावधीत क्षयरोगाचे १,९८० रुग्ण सापडले, तर पिंपरी- चिंचवडमध्ये गेल्या सहा महिन्यांत ९८४ क्षयरुग्णांची नोंद झाली आहे. या रुग्णांपैकी पुण्यात ९८ रुग्णांचा व पिंपरी- चिंचवडमध्ये ५६ क्षयरुग्णांचा गेल्या सहा महिन्यांत मृत्यू झाला.
राज्याच्या क्षयरोग विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, ‘पिंपरी- चिंचवडमध्ये क्षयरोगामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये काही प्रमाणात वाढ असली तरी प्रोग्रॅमधील क्षयरोगाचे मृत्यू वाढलेले नाहीत. प्रोग्रॅमच्या आकडेवारीनुसार साधारणपणे नवीन क्षयरुग्णांच्या संख्येच्या ५ टक्के रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो, परंतु मध्येच उपचार सोडून दिलेल्या रुग्णांमध्ये (री-ट्रीटमेंट) मृत्यूचे प्रमाण अधिक असू शकते.’ क्षयरोगाचे उपचार दीर्घकाळ चालत असून रुग्णांना ३ ते ४ प्रकारची औषधे दिली जातात. काही रुग्णांना औषधांचा त्रास होऊ शकतो किंवा इतर काही कारणांमुळे औषधे घेण्यात खंड पडतो किंवा औषधे मध्येच सोडून दिली जातात. परंतु ‘डॉटस्’ उपचार नियमित घेतल्यास ८५ ते ९० टक्के क्षयरुग्ण बरे होतात, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

विभाग            वर्ष                क्षयरुग्णांची संख्या     मृत्यू
पुणे ग्रामीण            २०१४                    ४२१३        २०३
२०१५ (जाने ते जून)            २१४९        ६८
पुणे शहर            २०१४                    ३७१८        १४५
२०१५                    १९८०        ९८
पिंपरी- चिंचवड        २०१४                    १८९६        १०२
२०१५                    ९८४        ५६

Two hundred patients of hair loss problem ICMR team in Shegaon
केसगळतीचे रुग्ण दोनशेच्या घरात; ‘आयसिएमआर’चे पथक शेगावात…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
1.5 thousand people committed suicide in Vasai Bhayander in 5 years
५ वर्षात वसई, भाईंदर मध्ये दिड हजार जणांच्या आत्महत्या;२०२४ मध्ये गळाफास घेऊन सर्वाधिक आत्महत्या
Nagpur Bharosa Cell , Nagpur , Bharosa Cell,
नागपूर : विस्कटलेल्या १६ हजार ८४३ कुटुंबियांना पोलिसांचा ‘भरोसा’
Hundreds of poor patients are receiving free dialysis services at health department hospitals
दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाची ‘टेलीमेडिसिन’ सेवा ठरतेय संजीवनी! सव्वा लाख रुग्णांना झाला फायदा…
sun shani and shukra grah yuti
पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी मिळणार; ३० वर्षानंतर सूर्य, शनी आणि शुक्र निर्माण करणार ‘त्रिग्रही योग’; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
17 bogus doctors found in a year annual review meeting of the District Health Department concluded thane news
बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याचे आव्हान; वर्षभरात १७ बोगस डॉक्टर आढळले, जिल्हा आरोग्य विभागाची वार्षिक आढावा बैठक संपन्न
interesting facts about formation of the himalayas
कुतूहल : हिमालयाची निर्मिती

‘खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी क्षयरोगासाठी नोंदणी करावी’
क्षयरोगासाठीच्या राज्याच्या प्रोग्रॅममध्ये नोंदणी केलेल्या रुग्णांना आरोग्य कर्मचारी किंवा ‘कम्युनिटी व्हॉलंटिअर’द्वारे ‘डॉटस्’ औषधे मोफत दिली जातात. सुरूवातीला ही औषधे प्रत्यक्ष देखरेखीखाली दिली जात असून नंतर  रुग्णाला आठवडय़ाचे औषध दिले जाते. दरम्यान, रुग्णाच्या थुंकीची तपासणीही केली जाते. याशिवाय राज्यातील ६ ते ७ हजार खासगी वैद्यकीय व्यावसायिक शासनाच्या ‘रीवाइज्ड नॅशनल टीबी कंट्रोल प्रोग्रॅम’मध्ये नोंदणीकृत आहेत, परंतु अनेक डॉक्टर प्रोग्रॅममध्ये नोंदणीकृत नसल्यामुळे त्यांच्याकडून क्षयरुग्णांची माहिती शासनाकडे एकत्रित होत नाही. ‘प्रोग्रॅममध्ये नोंदणीकृत असलेल्या खासगी डॉक्टरांकडे उपचार घेणाऱ्या रुग्णांनाही औषधे मोफत दिली जातात. डॉक्टरांच्या संघटनांमार्फत डॉक्टरांना नोंदणी करण्यासाठी आवाहन केले जाते, परंतु नोंदणीची सक्ती करता येत नाही,’ असे राज्याच्या ‘टीबी सेल’मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader