लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: शहरामध्ये ५१ रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. जुलै महिन्यात ३६ रुग्ण आढळले होते. गेल्या महिन्यापासून डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
MMC , complaints against doctors,
डॉक्टरांविरोधातील तक्रारींचा निपटारा करण्यात एमएमसीला यश, तक्रारींची संख्या १,७०० वरून ६०० वर
jaipur tanker blast injured people condition Bandages all over the body but viral video real or fake read fact check
जयपूरमधील स्फोटात होरपळलेल्या लोकांचे हाल? संपूर्ण शरीरावर बँडेज, धड चालताही येईना, पण या व्हायरल व्हिडीओची खरी बाजू पाहा
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
Manghar Transformation into India First Honey Village in crisis
महाबळेश्वरमधील ‘मांघर’च्या मधमाश्यांवर संकट
Borivali air, Air pollution Mumbai, Air pollution Borivali,
बोरिवलीची हवा ‘अतिवाईट’, मुंबईत हवा प्रदूषणाचे सत्र सुरूच

शहर आणि परिसरात जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे जून महिन्यामध्ये शहरात एकही डेंग्यूचा रुग्ण आढळला नाही. ताप आलेल्या ७७ हजार ६३१ रुग्णांची तपासणी केल्यानंतर डेंग्यूचे दोन हजार ९७५ संशयित रुग्ण आढळून आले. त्यामध्ये ५१ जणांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले. यामध्ये जुलै महिन्यात ३६ जणांना डेंग्यूची लागण झाली होती. या महिनाभरात १५ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे.

आणखी वाचा-पुणे: पत्नीचा बुद्ध्यंक कमी असल्याने घेतला घटस्फोट

तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायुदुखी व सांधेदुखी, उलट्या होणे, डोळ्यांच्या आतील दुखणे, अंगावर पुरळ, अशक्तपणा, भूक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे ही डेंग्यूची लक्षणे आहेत. डेंग्यूचे डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. त्यामुळे घराजवळील परिसरात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. घराच्या मागच्या अंगणातील किंवा गच्चीवरील भंगारमालाची विल्हेवाट लावावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

डेंग्यूचे रुग्ण वाढू नये, यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. डेंग्यूची लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. लवकर निदान होऊन त्यासाठी आवश्यक उपचार करणे शक्य होतात. घर आणि घराजवळील परिसर स्वच्छ ठेवावा. -डॉ. अभयचंद्र दादेवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका

Story img Loader