माहिती अधिकारातून पाच वर्षांतील आकडेवारी उघड; सर्वाधिक महाविद्यालये पुणे जिल्ह्य़ातील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चिन्मय पाटणकर, पुणे</strong>

गेल्या पाच वर्षांत राज्यभरातील ५६ तंत्रशिक्षण महाविद्यालयांना टाळे लागल्याचे चित्र समोर आले आहे. बंद झालेल्या ५६ महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक संस्था व्यवस्थापन आणि अभियांत्रिकीच्या असून, त्यात पुणे जिल्ह्य़ातील सर्वाधिक २१ संस्था आहेत. सन २०१६-१७ मध्ये सर्वाधिक १९ संस्था बंद झाल्या.

‘लोकसत्ता प्रतिनिधी’ने दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जाला राज्य सरकारच्या तंत्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आलेल्या उत्तरातून ही आकडेवारी स्पष्ट झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाचे शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थांचे पेव फुटले होते. अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाचे शिक्षण घेतल्यानंतरही नोकरी न मिळण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांचा या दोन्ही अभ्यासक्रमांकडे असलेला कल कमी झाला. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत अभियांत्रिकीच्या ५६ हजार जागा, तर पदव्युत्तर व्यवस्थापनाच्या ५ हजारहून अधिक जागा रिक्त राहिल्या होत्या. तर औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचे दिसून आले होते. या पाश्र्वभूमीवर, तंत्रशिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीतून राज्यातील तंत्रशिक्षणाची स्थिती समोर आली. टप्प्याटप्प्याने बंद झालेल्या तंत्रशिक्षण महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाच्या महाविद्यालयांसह हॉटेल व्यवस्थापन, औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयांचाही समावेश आहे. बंद झालेल्या महाविद्यालयांमध्ये पुणे जिल्ह्य़ातील २१, नागपूरमधील ८, सोलापूरमधील ७, रायगडमधील ४ महाविद्यालयांचा समावेश आहे. त्याशिवाय मुंबई, सांगली, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, वर्धा आदी जिल्ह्य़ांतील महाविद्यालयेही आहेत. नामांकित संस्थांची महाविद्यालयेही बंद झाल्याचे या माहितीतून स्पष्ट झाले.

गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमांपेक्षा अनेक वेगळे पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाले आहेत. नोकऱ्या उपलब्ध नसण्याची समस्या केवळ भारतातच नाही, तर जागतिक स्तरावरही आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमांना त्याचा फटका बसला. त्याशिवाय अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठीच्या जागा विद्यार्थ्यांच्या तुलनेत बऱ्याच जास्त असल्याने रिक्त राहतात. एवढय़ा जागांची आवश्यकता आहे का, हाही प्रश्नच आहे. या दोन अभ्यासक्रमांच्या बंद झालेल्या महाविद्यालयांप्रमाणे खूप कमी प्रवेश असलेल्या महाविद्यालयांची संख्याही मोठी आहे. आजपर्यंत एकाही विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झाली नाही अशीही अनेक महाविद्यालये राज्यात आहेत. महाविद्यालये बंद करण्याबाबत सरकारने धोरण ठरवण्याची आवश्यकता आहे.

– दुर्गेश मंगेशकर, तंत्रशिक्षण तज्ज्ञ

वर्षनिहाय आकडेवारी

२०१४-१५ – ९

२०१५-१६ – १५

२०१६-१७ – १९

२०१७-१८ – ११

२०१८-१९ – २