लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : तळवडे रेडझोनमधील अनधिकृत ‘स्पार्कल’ मेणबत्ती (कँण्डल) तयार करणाऱ्या कारखान्यात काम सुरू असताना अचानक भडका उडाल्याने झालेल्या स्फोटात सहा महिला कामगारांचा होरपळून मृत्यु झाला. त्यापैकी एका महिलेची ओळख पटली आहे.
पुनम अभयकुमार मिश्रा (वय ३८, रा. गणेशनगर, रूपीनगर, तळवडे) असे ओळख पटलेल्या महिलेचे नाव आहे. मुळचे उत्तर प्रदेशातील असणारे अभयकुमार मिश्रा गेल्या २० वर्षापासून तिघा भावांसह तळवडे येथे वास्तव्यास आहेत. अभयकुमार यांचा चाकण-आंबेठाण येथे फ़ॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. पत्नी पूनम आणि १४ वर्षीय मुलगी आणि १२ वर्षीय मुलगा यांच्यासह आम्ही चौकोनी कुटूंब आनंदात राहत होतो. पुनम चार महिन्यांपासून या कारखान्यात कामावर जात होती. सकाळी नऊ वाजता मी तिला कामावर सोडले होते. तिच आमची शेवटची भेट ठरली. आपल्याला कामाची गरज नाही. तु कशाला कामाला जातेस, असे मी म्हणत होतो. पण पुनमने ऐकले नाही, असे सांगताना अभयकुमार यांना अश्रू अनावर झाले. सकाळची आमची शेवटची भेट ठरली. दोन्ही मुले खासगी शिकवणीला गेले असून त्यांना अद्याप माहिती दिली नसल्याचे अभयकुमार मिश्रा यांनी सांगितले.
तळवडे येथील दुर्घटनेमध्ये मृतदेहांची ओळख पटणे अशक्य आहे. त्यामुळे मृतदेहांची ‘डीएनए’ चाचणी करण्याचा एकमेव पर्याय समोर आहे. सध्या मृतदेहापैकी एका महिलेच्या कानामध्ये डूल आहेत. दोन महिलांच्या हातामध्ये हिरव्या आणि लाल रंगाच्या बांगड्या आहेत. एका महिलेच्या हातामध्ये धातूच्या बांगड्या असून दोन महिलांच्या पायामध्ये पैंजण आहेत. मात्र यावरूनही ओळख पटणे अशक्य झाले. त्यामुळे डीएनए चाचणी करण्याचा एक पर्याय समोर आहे. मृतदेहा मधील चांगले अवयव बाजूला ठेवून पुण्यामध्ये आरएफएसएल या संस्थेमध्ये त्यांची डीएनए चाचणी करावी लागणार असल्याचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी सांगितले.