पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ झालेल्या वेगवेगळय़ा अपघातांत आतापर्यंत सुमारे ६० नागरिकांचे बळी गेले आहेत. बहुसंख्य अपघात वाहनचालकांच्या बेफिकिरीमुळे झाले आहेत. बाह्यवळण मार्गावर अपघात रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना फोल ठरल्याने या भागातून जाणारे वाहनचालक; तसेच पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. पुणे-सातारा महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्ग सुरू करण्यात आला. साताऱ्याकडून मुंबईकडे तसेच मुंबईहून साताऱ्याकडे जाणारे वाहनचालक या मार्गाचा वापर करतात. या मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणावर आहे. नवीन कात्रज बोगद्यापासून मुंबईकडे जाणारी वाहने दरी पूल ओलांडून नवले पूल परिसरात येतात. या भागात तीव्र उतार असल्याने वाहनचालकांचे नियंत्रण सुटून गंभीर अपघात घडले आहेत. नवले पूल परिसरात रहिवासी भाग आहे. त्यामुळे या भागातील रहिवासी हे नवले पुलाचा वापर करतात. बाह्यवळण मार्ग खुला झाल्यापासून आतापर्यंत वेगवेगळय़ा अपघातांत सुमारे ६० नागरिकांचे बळी गेले आहेत. त्यामध्ये नवले पूल या एकाच ठिकाणी गेल्या तीन वर्षांत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. अन्य अपघात हे या पुलापासून जवळच्या अंतरावर झाले आहेत.

नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा करण्यात आला. या भागात वाहतूक विषयक उपाययोजना करण्यात आल्याने गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे, असे वाहतूक शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक तोरडमल यांनी सांगितले. दरम्यान, रविवारी रात्री बाह्यवळण मार्गावर झालेल्या अपघातात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रकच्या धडकेने ४८ वाहनांचे नुकसान झाले असून, १३ जण जखमी झाले. या प्रकरणी ट्रक चालक मणीराम छोटेलाल यादव (रा. मध्यप्रदेश) याच्या विरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…

आणखी एक अपघात

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर रविवारी रात्री नऊच्या सुमारास भरधाव ट्रकने ४८ वाहनांना धडक दिल्याची घटना ताजी असतानाच रविवारी रात्री आणखी एक अपघात झाला. स्वामी नारायण मंदिराजवळ झालेल्या या अपघातात ट्रकने सात वाहनांना धडक दिली. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. राजेंद्र खंडेराव साळुंके (वय ४१, रा. मांगडेवाडी, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

नवले पुलाजवळ झालेले अपघात

वर्ष प्राणांतिक   मृत्यू

    अपघात

२०१८   ३   ३

२०१९   २   २

२०२०   ३   ७

२०२१   ७   ७

२०२२   ३   ३

(२०२२ ची आकडेवारी ऑक्टोबर अखेरपर्यंतची)