पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ झालेल्या वेगवेगळय़ा अपघातांत आतापर्यंत सुमारे ६० नागरिकांचे बळी गेले आहेत. बहुसंख्य अपघात वाहनचालकांच्या बेफिकिरीमुळे झाले आहेत. बाह्यवळण मार्गावर अपघात रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना फोल ठरल्याने या भागातून जाणारे वाहनचालक; तसेच पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. पुणे-सातारा महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्ग सुरू करण्यात आला. साताऱ्याकडून मुंबईकडे तसेच मुंबईहून साताऱ्याकडे जाणारे वाहनचालक या मार्गाचा वापर करतात. या मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणावर आहे. नवीन कात्रज बोगद्यापासून मुंबईकडे जाणारी वाहने दरी पूल ओलांडून नवले पूल परिसरात येतात. या भागात तीव्र उतार असल्याने वाहनचालकांचे नियंत्रण सुटून गंभीर अपघात घडले आहेत. नवले पूल परिसरात रहिवासी भाग आहे. त्यामुळे या भागातील रहिवासी हे नवले पुलाचा वापर करतात. बाह्यवळण मार्ग खुला झाल्यापासून आतापर्यंत वेगवेगळय़ा अपघातांत सुमारे ६० नागरिकांचे बळी गेले आहेत. त्यामध्ये नवले पूल या एकाच ठिकाणी गेल्या तीन वर्षांत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. अन्य अपघात हे या पुलापासून जवळच्या अंतरावर झाले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा