लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: मैत्रिणीला कर्ज काढण्यास भाग पाडून कर्जाचे हप्ते न फेडता ६९ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका महिलेसह तिच्या आई-वडिलांच्या विरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Murder of petrol pump owner of Virar two accused arrested by crime branch team
विरारच्या पेट्रोलपंप मालकाची हत्या, गुन्हे शाखेच्या पथकाकडून दोन आरोपींना अटक
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Two bullets entered Vanraj Andekar body according to the postmortem report
वनराज आंदेकरांच्या शरीरात दोन गोळ्या शिरल्या; आरोपींकडून  तब्बल २४ वार, शवविच्छेदन अहवालातून माहिती समोर 
Somnath Gaikwad arrested in Vanraj Andekar murder case Pune news
वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड गजाआड; आंदेकर यांची बहीण आणि भाचाही अटकेत
A case has been registered against BJP MLA Parinay Phuke and his family Nagpur news
भाजपचे आमदार परिणय फुके यांच्यासह कुटुंबीयांवर गुन्हा दाखल, दिवंगत भावाच्या पत्नीची पोलिसात तक्रार
Badlapur sexual assault, Akshay Shinde Badlapur,
Badlapur sexual assault : ‘त्या’ आरोपीला न्यायालयीन कोठडी, आणखी कलमांचा समावेश, शाळेच्या अध्यक्षांसह सचिव फरार
cbi investigation into financial irregularities in r g kar medical college
आर्थिक अनियमिततेप्रकरणी ‘सीबीआय’चा तपास; कोलकाता हत्या प्रकरणात आरोपींच्या मालमत्तांचीही झडती
Mumbai, Badlapur Case,Suspended police Officer, Shubhada Shitole Shinde Transferred , assembly elections, police transfers, senior police inspectors
बदलापूर प्रकरणात निलंबित पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे- शिंदे यांच्यासह ठाण्यातील १४ पोलीस निरीक्षकांची मुंबईत बदली

या प्रकरणी कल्याणी शशिकांत लोणकर (वय ३४), शशिकांत वसंत लोणकर (वय ५६), समीधा शशिकांत लोणकर, सुशील लोणकर, उत्तम शेळके यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत एका ३९ वर्षीय महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला बँक कर्मचारी आहे.

हेही वाचा… पुणे: माजी महसूलमंत्र्यांचा सचिव असल्याच्या बतावणीने बड्या उद्योगसमूहातील निवृत्त अधिकाऱ्याला ५९ लाख रुपयांचा गंडा

तक्रारदार महिला आणि आरोपी कल्याणी लोणकर एकाच सोसायटीत राहायला आहेत. दोघी मैत्रिणी आहेत. कल्याणी विवाहित असून तिने वैवाहिक जीवनातील अडचणी सांगून तातडीने ५० ते ६० लाख रुपयांची गरज असल्याचे मैत्रिणीकडे मदत मागितली. मला मदत कर. तुझ्या नावावर बँकेतून कर्ज काढ. मी दरमहा नियमित हप्ता भरेन, असे कल्याणीने तिला सांगितले. त्यानंतर बँकेकडून एवढे कर्ज मिळणार नसल्याचे महिलेने कल्याणीला सांगितले.

हेही वाचा… पुणे: ऑनलाइन मागविलेल्या मोबाइलऐवजी खोक्यात साबणाच्या वड्या; फसवणूक करणारे ठाण्यातील चोरटे गजाआड

कल्याणीने उत्तम शेळके नावाच्या एका व्यक्तीशी ओळख करुन दिली. बँकेतील कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे काम शेळक करतो, असे कल्याणीने तिला सांगितले. मैत्रिणाला कर्ज मंजुरीसाठी शेळकेला कागदपत्रे देण्यास भाग पाडले. त्यानंतर कागदपत्रांचा गैरवापर करुन आरोपी कल्याणीने मैत्रिणीच्या नावावर ८० लाख रुपयांचे कर्ज काढले. कल्याणीने ४८ लाख चार हजार रुपयांचे कर्ज फेडले. उरलेले हप्ते न भरल्याने मैत्रिणीला आर्थिक झळ सोसावी लागत होती. तिला दरमहा एक लाख ७० हजार रुपये हप्ता भरावा लागत होता. मैत्रिणीने पैसे भरण्यास सांगितले. तेव्हा माझे काका शहरातील एका पोलीस ठाण्यात आहेत. काकाला सांगेन, अशी धमकी दिली. त्यानंतर तक्रारदार महिला कल्याणीच्या आई-वडिलांच्या घरी गेली. मैत्रिणीला कल्याणीच्या आई-वडिलांनी मारहाण केली. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर तपास करत आहेत.