स्पीकरवरून निर्माण झालेला वाद एका ज्येष्ठ नागरिकाच्या जीवावर बेतला. अपमानित झाल्याने एका ७० वर्षीय नागिरकाने बंडगार्डन नदी पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
ज्ञानेश्वर साळुंखे (वय ७०, रा. नवी खडकी) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबत पांडुरंग ज्ञानेश्वर साळुंखे (वय ४७) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी चेतन बेले (वय २६), देवेश ऊर्फ नन्या पवार (वय १८), यश मोहिते (वय १९), शाहरुख खान (वय २६), जय तानाजी भडकुंभे (वय २२) यांना अटक केली आहे. नवी खडकी भागात ही घटना घडली.
हेही वाचा >>> पिंपरी: नणंदा-सासू यांचे केस विंचरण्यावरून टोमणे; सुनेने घेतला गळफास, सांगवी पोलिसात तक्रार दाखल…
फिर्यादी साळुंखे यांच्या घराशेजारी चेतन बेले राहतात. त्यांच्या घरात हळदीचा कार्यक्रम सुरू होता. स्पीकर लावल्यामुळे त्याठिकानी मोठा गोंधळ सुरू होता. स्पीकरच्या आवाजाचा त्रास होत असल्याने ज्ञानेश्वर साळुंखे यांनी त्या ठिकाणी जाऊन आवाज करु नका, आम्हाला त्रास होतो असे सांगितले. यावरून आरोपींनी त्यांना अपमानित केले आणि हाकलून दिले. त्यानंतरही बराच वेळ गोंधळ सुरू होता. त्यामुळे साळुंखे पुन्हा त्या ठिकाणी जाऊन आवाज कमी करा असे सांगत होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या घरातील लोक त्यांना सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण केली. चेतन बेले याने फिर्यादीच्या डोक्यात कोयता मारुन जखमी केले. त्यांनी फिर्यादी हे येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. त्या गोष्टीचा राग मनात धरुन आरोपी यांनी पुन्हा फिर्यादीचे वडिल ज्ञानेश्वर साळुंखे यांनी मारहाण केली. मारहाणीमुळे अपमान सहन न झाल्याने त्यांनी बंडगार्डन पुलावरुन नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली.