जनजागृतीमुळे मतदारांची संख्या वाढली; शहरात २९ लाख मतदार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्य़ात गेल्या वर्षभरापासून घेण्यात आलेल्या मतदारनोंदणी मोहिमांमुळे मतदारांची संख्या वाढली आहे. जिल्ह्य़ाची मतदार यादी ७१ लाख ९६ हजार ७०१ मतदारांची झाली आहे. त्यात पुणे शहरातील मतदारांची संख्या २९ लाख १३ हजार २९८ तर पिंपरी-चिंचवडमध्ये ११ लाख ९५ हजार ३६६ एवढी आहे. आणखी ४९ हजार मतदारांचे अर्ज आले असून त्यांची नोंदणी झाल्यानंतर १० जानेवारी २०१८ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.

मतदारनोंदणीसाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच विद्यापीठ, महाविद्यालय स्तरावर युवा मतदारांची नोंदणी करण्यात आली. त्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे. जिल्ह्य़ातील ७१ लाख ९६ हजार ७०१ मतदारांचा समावेश मतदार यादीत झाला आहे. पुणे शहरामध्ये २९ लाख १३ हजार २९८ मतदारांची नोंद झाली असून, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ११ लाख ९५ हजार ३६६ मतदार आहेत. जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील ३० लाख ८८ हजार ३७ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने एक जानेवारी २०१८ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मतदार याद्या अद्ययावत करण्यात येत आहेत.

मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) मतदारांच्या घरी जाऊन माहिती घेतली आहे. १५ डिसेंबपर्यंत हरकती आणि सूचना स्वीकारण्यात आल्या. नव्याने आलेल्या अर्जाची नोंदणी करून अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी प्रत्येक सहायक निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध केली जाणार आहे. ग्रामीण भागात तहसीलदार कार्यालयात यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याशिवाय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही यादी पाहण्याची सुविधा आहे.

जिल्ह्य़ात आतापर्यंत ७१ लाख ९६ हजार ७०१ मतदार झाले आहेत. १५ डिसेंबपर्यंत राबविलेल्या विशेष मोहिमेमध्ये ३७ हजार ३७७ अर्ज आले आहेत. या शिवाय १२ हजार अर्जाची नोंदणी अद्याप झालेली नाही. संबंधित ४९ हजार अर्जाची नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. ही नोंदणी झाल्यानंतर १० जानेवारी २०१८ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूकअधिकारी मोनिका सिंह यांनी दिली.

राज्यात सर्वाधिक अर्ज पुणे जिल्ह्य़ातील

राज्यात सर्वत्र मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली असून त्यात सर्वाधिक अर्ज पुणे जिल्ह्य़ातून आले आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात २ लाख ९० हजार २८५, हडपसर मतदार संघात ४ लाख ४५ हजार १११, खडकवासला ४ लाख ५० हजार १३७, कसबा पेठ २ लाख ८१ हजार ४६९, कोथरूड ३ लाख ८१ हजार ४३५, वडगाव शेरी ४ लाख १९ हजार ८५६, पर्वती ३ लाख ४७ हजार २२४, शिवाजीनगर २ लाख ९७ हजार ७८१, चिंचवड ४ लाख ६४ हजार ३७, पिंपरी ३ लाख ३६ हजार ५०३, भोसरी ३ लाख ९३ हजार ८२६ अशी मतदारांची संख्या आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 71 lakh voters in pune districta number of voters increased