पुणे : पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकअदालतीत आतापर्यंत ७५ हजार ४०४ दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले असून, दाव्यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकअदालतीत तडजोडीसाठी ठेवण्यात आलेले ३८ हजार ७९८ दावे दाखलपूर्व, तसेच ३६ हजार ६०६ दावे प्रलंबित स्वरूपाचे असल्याची माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष सोनल पाटील यांनी दिली. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशाने प्रमुख जिल्हा न्यायाधीश, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> चांदणी चौकात भुलभुलैया!; दिशादर्शक फलकांअभावी वाहनचालकांमध्ये गोंधळ

तडजोडीयोग्य फौजदारी, दिवाणी, धनादेश न वटणे, बँक कर्जवसुली, कामगार वाद, वीज, पाणी देयक, कौटुंबिक दावे, मोटार अपघात न्यायप्राधिकरण, भूसंपादन, महसूल, वाहतूकविषयक तक्रारींचे दावे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. दावे तडजोडीसाठी न्यायाधीश, निवृत्त न्यायाधीश, वकील आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते आदींचा पॅनलमध्ये समावेश असणार आहे. गेल्या लोकअदालतील ५४ पॅनल होते.

हेही वाचा >>> मोटारीतून येऊन महावितरणच्या रोहित्रातून तांब्याची तार चोरणारी टोळी गजाआड

गेल्या काही वर्षांपासून पुणे दावे निकाली काढण्यात राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. गेल्या लोकअदालतीत प्रलंबित स्वरूपाचे ४४ हजार ६१४ दावे ठेवण्यात आले होते. त्यांपैकी १६ हजार ६४५ दावे निकाली काढण्यात आले होते. दाखलपूर्व स्वरूपाचे १० लाख २२ हजार ११९ दावे ठेवण्यात आले होते. त्यांपैकी एक लाख चार हजार ५३२ दावे निकाली काढण्यात आले होते, असे पाटील यांनी नमूद केले.

लोकअदालतीत तडजोड केल्यास पक्षकारांचा वेळ आणि पैसेही वाचतात. पक्षकारांची मानसिक त्रासातून सुटका होते. लोकअदालतीत जलद न्याय मिळतो. दोन्ही बाजूंकडील पक्षकारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे कोणाच्या मनात कटूता राहत नाही. पक्षकारांनी लोकअदालतीत दावे तडजोडीस ठेवण्यास प्राधान्य द्यावे. – श्याम चांडक, प्रमुख जिल्हा न्यायाधीश

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 75 thousand 404 claims for compromise in lok adalat pune print news rbk 25 ysh
Show comments