महाराष्ट्रात महिला अत्याचार, अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची अनेक प्रकरण समोर येत आहेत. पिंपरी- चिंचवड शहरात देखील गेल्या आठ महिन्यांत बलात्कार आणि विनयभंग प्रकरणात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसे आकडे समोर आले आहेत. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. याबाबत उशिरा का होईना? परंतु, पोलीस प्रशासन आणि चमकोगिरी करणाऱ्या राजकीय व्यक्तींना जाग आली असून शाळेत जाऊन अल्पवयीन मुलींना बॅड टच गुड टचची माहिती दिली जात आहे. तसे निवेदन शाळांना दिले जात आहे.

बदलापूरच्या घटनेनंतर अवघ्या महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. घटनेमुळे अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अल्पवयीन मुली या शाळेतच सुरक्षित नसतील तर शिक्षण कसं घेणार हा देखील मोठा प्रश्न आहे. बहुदा, अल्पवयीन मुलींच्या प्रकरणात शाळेमध्ये, शेजारी राहणारी व्यक्तीकडून चॉकलेटचे अमिश दाखवून अल्पवयीन मुलींचं शोषण केले जाते. अत्याचार केले जातात. असे वारंवार समोर आलेल आहे. पालकांनी इतरांवर अवलंबून न राहता आपल्या अल्पवयीन मुलीला बॅड आणि गूड टचचे शिक्षण दिलं पाहिजे, असं बोललं जात आहे. पिंपरी- चिंचवड शहरात गेल्या आठ महिन्यांत ७८ अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. पैकी, ५६ प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तर, अल्पवयीन मुलींच्या बाबतीत विनयभंगातील ६६ प्रकरणं दाखल असून पैकी ४० प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहेत.

Request to the court to quash the rape charges against the boy by the girl in Nagpur news
मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
satish wagh murder case mohini wagh and 5 others remanded to police custody till 30 december
खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
criem news
विशाल गवळीने घरातच मुलीवर अत्याचार करून केली तिची हत्या , पत्नीच्या साह्याने मृतदेहाची विल्हेवाट
kalyan east minor girl rape case
कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी दोन जण अटक, दाढी करून पेहराव बदलत असताना विशाल गवळीवर पोलिसांची झडप
Rape on Minor Girl and then Accused Killed Her
Kalyan Crime : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या, मृतदेह बापगाव भागात फेकला; आरोपी विशाल गवळीला अटक

हेही वाचा – पुणे : शिरुर पोलीस ठाण्यासमोर डिझेल ओतून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

हेही वाचा – दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर… किती विद्यार्थी झाले उत्तीर्ण?

अल्पवयीन मुलांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करू नका

पालकांनो अल्पवयीन मुलांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करू नका. अल्पवयीन मुलं पालकांना खूप काही सांगण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे पालकांनी गांभीर्याने आणि लक्षपूर्वक बघणं, ऐकणं गरजेचं आहे. शाळेत देखील आपल्या पाल्याच्या वर्ग शिक्षकांशी सुसंवाद ठेवायला हवा. मुलं एकांतात बसल्यास त्यांच्याशी चर्चा करायला हवी.

Story img Loader