पिंपरीत पाचशे आणि एक हजार रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सात लाख तीस हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
महंमद हुसेन (वय २५), सेरातअली जलाउद्दीन शेख (वय २६), सुलेमान इस्ताबअली शेख (वय १९), मोहंमद अबुकलाम मोहंमद माजीद शेख (वय २६), हजरत अली हदेश अली (वय २०), मसियुर रेहमान गीयासुद्दीन शेख (वय २५), मोहंमद इसुफअली इसराद्दीन अली(वय २१) आणि मुबारक मुतीऊर रेहमान हुसेन (वय २८, रा. सर्वजन-दळवीनगर, नांदेडसिटीजवळ, मूळ- मालडा, पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वल्लभनगर येथील एका वाईन शॉपमध्ये शुक्रवारी रात्री एका तरूणाने एक हजार रुपयांची बनावट नोट देऊन बिअर घेतली. काही वेळानंत्बिअरशॉपीच्या मालकास ही नोट बनावट असल्याचा संशय आला. पण, काही वेळातच आणखी एक जण हजार रुपयांची नोट घेऊन बिअर घेण्यासाठी आला असता त्याला पकडून पोलिसांना कळविण्यात आले. तत्काळ पिंपरी पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी त्या तरुणास ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते सर्वजण नांदेड सिटी जवळील दळवीनगर येथे राहत असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी सहा जणांस ताब्यात घेतले. त्याच्याकडे एकूण पाचशे आणि हजार रुपयाच्या सात लाख तीस हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. याप्रकरणी िपपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा