पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख सार्वजनिक वाहतूक असलेल्या पीएमपीला गणेशोत्सवातील पाच दिवसात ८ कोटी २७ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. त्याचबरोबरच विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून २ लाख ९१ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या विशेष फेरीची निवड यादी १५ सप्टेंबरला

गणेशोत्सव कालावधीत शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपतीची केलेली रोषणाई आणि विविध देखावे-सजावटी पाहण्यासाठी उपनगर तसेच बाहेरगावाहून अनेक नागरिक शहरात येत असतात. त्यामुळे प्रवाशांच्या सोईसाठी पीएमपीकडून जादा गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त पद्धतीने यंदा गणेशोत्सव साजरा होत असल्याने यंदा पीएमपीकडू तब्बल ६५४ जादा गाड्या संचलनात आणण्यात आल्या. तसेच रात्री दहा वाजल्यानंतर मार्गावरील सर्व गाड्या यात्रा विशेष म्हणून जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार तीन सप्टेंबर ते सात सप्टेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत पीएमपीला ८ कोटी २७ लाख ४५ हजार ७३२ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली. या पाच दिवसांत ८ हजार १४३ गाड्यांद्वारे ५७ लाख ४३ हजार २४८ प्रवाशांनी पीएमपीने प्रवास केला. तसेच विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून २ लाख ९१ हजार ६०० रुपये वसूल करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 8 crore 27 lakhs income pmp five days travel passengers pune print news ysh