नृत्य कलाकाराच्या घरातील खिडकीची जाळी उचकटून चोरट्यांनी सात लाखांची रोकड, दागिने, परदेशी चलन असा आठ लाख १५ हजारांचा ऐवज लांबविण्यात आला. कात्रज भागात ही घटना घडली.याबाबत रोशनी डिकोना यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या कात्रजमधील आंबेगाव बुद्रुक परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत.
हेही वाचा >>> स्वारगेट परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा ; १७ जणांविरुद्ध गुन्हे शाखेची कारवाई
त्यांच्या घराच्या खिडकीची जाळी उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटातील सात लाखांची रोकड, सोन्याचे दागिने, परदेशी चलन असा ऐवज लांबविला. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. डिकोना या देश; तसेच परदेशात नृत्याचे कार्यक्रम सादर करतात. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करत आहेत.