पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गुईलेन बॅरे सिंड्रोमचे आठ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी बरे झालेल्या तीन रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. वायसीएम रुग्णालयात तीन तर खासगी रुग्णालयात दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शहरातील भोसरी, चिखली, पिंपरी, पिंपळेगुरव या भागात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे आठ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यातील तिघांवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी एकाही रुग्णाची प्रकृती गंभीर नाही. सर्वांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत. रुग्ण आढळून आलेल्या परिसरात सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या परिसरात इतर व्यक्तींमध्ये सारखी लक्षणे दिसून येत आहेत का, याची माहिती घेतली जात आहे. याचबरोबर रुग्णांनी अलीकडच्या काळात प्रवास केला होता का, याचीही माहिती घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पाणी उकळून प्यावे, अस्वच्छता असलेल्या ठिकाणचे बाहेरचे अन्नपदार्थ सेवन करू नये असे आवाहन डॉ. गोफणे यांनी केले.