लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : उच्च ऊर्जा पदार्थ संशोधन संस्थेने (एचईएमआरएल) लष्करासाठी ८१ मिलिमीटर उष्णतारोधी (अँटीथर्मल), प्रखर प्रकाशरोधी (अँटीलेझर) ‘स्मोक ग्रेनेड’ विकसित केले आहे. या ग्रेनेडचा वापर टी ७२, टी ९०, एमबीटी अर्जुन आणि बीएमपी २ अशा रणगाड्यांद्वारे करणे शक्य असून, हे ग्रेनेड स्वदेशी विकास आणि उत्पादनासाठीच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेतील एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

Firing at the house of an independent candidate in Jalgaon news
जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
Amit Shah and Vinod Tawde meeting
Vinod Tawde Meeting with Amit Shah: “मराठा मुख्यमंत्री…
Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
ठाणे : पोलिसांकडून आता ड्रोनद्वारे पाहाणी
Hadapsar fire
Video: पुण्यातील हडपसर भागातील जुन्या इमारतीत आग, लहान मुलांसह सात रहिवाशांची सुटका
ambulance
गर्भवती महिलेचा थोडक्यात वाचला जीव! रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, थरारक Video कॅमेऱ्यात कैद
ukraine nuclear bomb
रशिया-युक्रेन संघर्ष अणुयुद्धात बदलणार? युक्रेनची अणुबॉम्बची तयारी? काय होणार जगावर परिणाम?

शत्रूच्या रणगाड्याची थर्मल इमेजिंग साइट आणि लेझर रेंज फाइंडर निष्प्रभ करण्यासाठी या ग्रेनेडद्वारे तत्काळ धुराचा पडदा निर्माण करता येतो. ८१ मिलिमीटर व्यासाच्या लाँचरमधून ही ग्रेनेड ५५ ते ७५ मीटर अंतरावर डागले जाते. डागल्यानंतर केवळ चार ते पाच सेकंदांत चार ग्रेनेडमुळे वीस सेकंदांपेक्षा अधिक काळासाठी दाट पांढऱ्या धुराचा पडदा तयार होतो. हा धूर दृश्यमानता आणि विद्युत चुंबकीय स्पेक्ट्रममध्ये ०.४ ते १४ सूक्ष्ममीटर या श्रेणीत प्रभावी ठरतो. तसेच, तो आधुनिक रणगाड्याचे थर्मल इमेजिंग साइट, लेझर रेंज फाइंडर निष्प्रभ करण्यास सक्षम असतो.

आणखी वाचा-झिकाचा धोका! राज्यात एकूण रुग्णसंख्या १४० वर; रुग्णांमध्ये गर्भवतींचे प्रमाण जास्त

लष्कराने या ग्रेनेडच्या विविध निकषांवर चाचण्या घेतल्यानंतर त्याची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. लेझर रेंज फाइंडर आणि थर्मल इमेजर निष्प्रभ करण्याच्या तांत्रिक प्रगतीमुळे हे उत्पादन जागतिक स्तरावरील तत्सम उत्पादनांपेक्षा अधिक प्रभावी ठरणारे आहे. या ग्रेनेडचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी हे तंत्रज्ञान स्थानिक दारुगोळा कारखाना आणि नागपूरस्थित इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह्ज या कंपनीला ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत हस्तांतरित करण्यात आले आहे. लष्कराने या उत्पादक संस्थांकडे एक लाख ग्रेनेडच्या उत्पादनाची मागणी नोंदवली आहे. सध्या या ग्रेनेडचे नियमित उत्पादन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली.

आणखी वाचा-घरांच्या विक्रीला एप्रिलपासून लागलेली घरघर अखेर थांबली; पुण्यात यंदा गृहखरेदीची ‘दिवाळी’

बोरॉन पावडरची आयात शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट

लष्कराच्या विविध संरक्षण साहित्यामध्ये वापरली जाणारी बोरॉन पावडर देशात उपलब्ध होत नाही. तसेच, त्याची आयात करणेही कठीण आहे. त्यामुळे एईएमआरएलने बोरॉन पावडरच्या देशांतर्गत निर्मितीसाठी बोरिक अनहायड्राइडच्या मेटलॉथर्मिक रीडक्शन प्रक्रियेद्वारे स्वदेशी, किफायतशीर आणि मोठ्या प्रमाणात उत्पादनक्षम तंत्रज्ञान विकसित केले आहे. बोरॉन पावडर तयार करण्यासाठी किमान ८५ टक्के शुद्धता, किमान ९१ टक्के शुद्धता, ९५ टक्क्यांपेक्षा अधिक उच्च शुद्धता अशा तीन प्रकारांसाठीचे निर्मिती तंत्रज्ञान विकसित केले आहे. लष्कराच्या विविध संरक्षण प्रकल्पांत बोरॉन पावडरची गरज भागवण्यासाठी दोन प्रकारांसाठीचे तंत्रज्ञान दोन कंपन्यांना हस्तांतरित करण्यात आले आहे. आता २०२५पर्यंत बोरॉन पावडरची आयात शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.