पुणेकरांच्या लढय़ाचे सहस्रचंद्रदर्शन
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सायकल कर आकारणी करण्याची तरतूद असलेला ठराव नागरिकांच्या विरोधाची दखल घेत पुणे महापालिकेला फेटाळावा लागला या घटनेला सोमवारी ८१ वर्षे पूर्ण झाली. नागरिकांनी केलेल्या प्रचंड विरोधानंतर नागरिकांचा विजय झाला होता. एखाद्या व्यक्तीने ८१ वर्षे पूर्ण केल्यानंतर त्याचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा साजरा केला जातो. त्या धर्तीवर पुणेकर नागरिकांच्या या लढय़ाचेही सहस्रचंद्रदर्शन साजरे झाले.
सायकलींचे शहर ही एकेकाळी पुण्याची ओळख होती. पुणे हे मध्यमवर्गीयांचे शहर आणि सायकल हे मध्यमवर्गीयांचे वाहन होते. त्यामुळे पूर्वीच्या पुण्यामध्ये सायकल हेच वाहतुकीचे प्रमुख वाहन होते. सायकल असलेली व्यक्ती सधन समजली जात असण्याचा तो काळ होता. पूर्वीच्या पुण्यामध्ये काही ठिकाणी सायकल स्टँडही होते. त्या वेळच्या पुणे नगरपालिकेने सायकल कर आकारणीचा प्रस्ताव ठेवला त्याला पुणेकरांनी कडाडून विरोध केला होता. नागरिकांच्या या विरोधाची दखल घेत अखेरीस नगरपालिकेने सायकल कर आकारणी करण्याची तरतूद असलेला ठराव ३ जुलै १९३६ रोजी फेटाळला, या घटनेला सोमवारी ८१ वर्षे पूर्ण झाली.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. मा. प. मंगुडकर यांनी संपादित केलेल्या ‘पुणे नगरसंस्था शताब्दी ग्रंथा’मध्ये त्यावेळच्या पुण्यातील वाहनांची आणि या वाहनांवरील कर आकारणीची रंजक माहिती मिळते. तत्कालीन पुणे नगरपालिकेकडून ढकलगाडी, हातगाडी, मजुरांची गाडी अशा मशीनव्यतिरिक्त दोनचाकी वाहनांसाठी वार्षिक चार रुपये कर आकारला जात होता. घोडय़ाव्यतिरिक्त जनावराकडून ओढल्या जाणाऱ्या वाहनाकडून चार ते आठ रुपये तर, घोडय़ाकडून ओढल्या जाणाऱ्या वाहनासाठी १२ रुपये कर होता. सायकलसाठी वार्षिक दोन रुपये तर, सायकलरिक्षा या वाहनासाठी बारा रुपये कर आकारणी केली जात होती. १९४१-४२ मध्ये मोटारी, सायकली, व्हिक्टोरिया, टांगे, दोन बैलांच्या गाडय़ा, एका बैलाची गाडी आणि हातगाडय़ा अशा सर्व वाहनांची मिळून संख्या ही केवळ ४ हजार ३३७ इतकी होती. नंतरच्या दहा वर्षांत म्हणजे १९५०-५१ मध्ये ही संख्या दुप्पटीने वाढून ८ हजार ६२० झाली होती. सायकलीपासूनचे उत्पन्न हे १९५० नंतरच्या कालखंडात वाढले. युद्धकाळात सायकलीच्या आयातीवर र्निबध होते. १९५० मध्ये हे र्निबध सैल झाले. त्यानंतर सायकलींची आयात वाढली आणि नगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडली. पुढे सायकलची किंमत वाढली आणि त्यामुळे जकातीचे उत्पन्न वाढण्यास मदत झाली, असे या शताब्दी ग्रंथात नमूद केले आहे.