भीमा कोरेगाव विजय स्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून बुधवारी रात्री सराईताची झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईत ४ हजार ९१ गुन्हेगारांची झाडाझडती घेऊन ८४१ जणांना अटक करण्यात आली. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचसह सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सराईत गुन्हगारांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
हेही वाचा- चिंता वाढवणारी बातमी! पुणे विमानतळावर आढळला करोना पॉझिटिव्ह रुग्ण
शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यानुसार स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेतील विविध पथकांनी बुधवारी रात्री नऊ ते पहाटे दोन वाजेपर्यंत सर्च मोहीम राबवून ८४१ गुन्हेगारांंना अटक केली. त्याशिवाय बेकाायदा शस्त्र बाागल्याप्रकरणी ३८ जणांना अटक करून त्यांच्याकडून ४० कोयते, चार तलवारी, तीन सत्तुर असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
अमली विरोधी पथकाने मेफेड्रॉन तस्कराला अटक करून १० लाख ७६ हजारांचा एमडी जप्त केले. गावठी दारूविक्री प्रकरणी ४६ केसेस करून ४८ हजारांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. सीआरपीसी कायद्यानुसार ७६ आरोपींविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. जामिनावर कारागृहातून सुटून आलेल्या आरोपींनाही नोटीस देण्यात आली.
पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त राजेंंद्र डहाळे, अपर आयुक्त नामदेव चव्हाण, अपर आयुुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, उपायुक्त स्मार्तना पाटील, उपायुक्त सुहैल शर्मा, उपायुक्त, शशिकांत बोराटे, उपायुक्त विक्रांत देशमुख, वाहतूक उपायुक्त विजय मगर आदींनी ही कारवाई केली.