अपुऱ्या शिक्षकांच्या समस्येवर तोडगा म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेने मानधनावर शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. २८५ जागांसाठी गुरूवारी ८५० जणांनी अर्ज दाखल केले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा- पुणे : नवले पूल परिसरातील अतिक्रमणे सात दिवसांत न काढल्यास कारवाई
पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांसाठी सहायक शिक्षक आणि पदवीधर शिक्षकांच्या जागा सरळ सेवा पद्धतीने भरण्यात येणार आहेत. प्रत्येकी सहा महिन्यांसाठी असणाऱ्या या जागांवर निवड होणाऱ्या शिक्षकांना २० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. पिंपरीतील कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत याबाबतचे अर्ज गुरूवारी स्वीकारण्यात आले. शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले की, दोन्ही पदे मिळून २८५ जागा आहेत. गुरूवारी ८५० अर्ज दाखल झाले आहेत. अर्जांची छाननी सुरू केली आहे. १० दिवसांमध्ये याबाबतचा निकाल जाहीर केला जाईल.
First published on: 08-12-2022 at 18:27 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 850 applications for the recruitment of emolument teachers in pimpri municipality pune print news bej 15 dpj