लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: आयुर्विमा पॉलिसी मुदतबाह्य झाल्याचाी बतावणी करुन सायबर चोरट्यांनी डेक्कन जिमखाना भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची ८८ लाख ९४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे भांडारकर रस्ता भागात राहायला आहेत. तक्रारदारांची खासगी बँकेची आयुर्विमा कंपनीची पॉलिसी आहे. सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. करोना काळात त्यांनी पॉलिसीचे हप्ते भरले नव्हते. चोरट्यांनी बँक कर्मचारी असल्याची बतावणी केली होती. मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून पैसे न भरल्यास आयुर्विमा पॉलिसी मुदतबाह्य ठरेल, असे सांगितले होते. हप्ते भरल्यानंतर पॉलिसी सुरू होईल, असे सांगून सायबर चोरट्यांनी जाळ्यात ओढले.

आणखी वाचा-समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पिंपरी- चिंचवडमधील मायलेकीसह सासूचा मृत्यू

पॉलिसीची पैसे भरल्यानंतर परतावा मिळेल, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाकडून वेळोवेळी ८८ लाख ९४ हजार रुपये उकळले. ज्येष्ठ नागरिक बँकेत गेले होते. त्यांनी बँकेत विचारणा केली. तेव्हा बँक कर्मचाऱ्याने संपर्क साधला नसल्याचे उघडकीस आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

या प्रकरणी पोलिसांनी पूजा कदम, अंकित, देशमुख, नरेंदर, रामचंद्र रेड्डी, मयंक अग्रवाल, सुशांत असे नाव सांगणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील तपास करत आहेत.