स्वसंरक्षणासाठी जवळ बाळगलेला पेपर स्प्रे लीक झाल्यामुळे डॉ. डी. वाय. पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील नऊ विद्यार्थिनींना शनिवारी दुपारी त्रास होऊन लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर सायंकाळी या सर्व मुलींना घरी सोडण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वसंरक्षणासाठी पेपर स्प्रे महिला जवळ बाळगतात. या नऊ मुलींपैकी एकीने ठेवलेला पेपर स्प्रेची गळती झाल्यामुळे त्याचा नऊ जणींना त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना तत्काळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील एका मुलीला डायबेटीजचा त्रास असल्यामुळे तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. या सर्वावर उपचार केल्यानंतर सायंकाळी त्यांना घरी सोडण्यात आले असून त्यांची प्रकृती ठीक आहे. या सर्व विद्यार्थिनी अकरावीतील आहेत.

Story img Loader