पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने महिनाभरात कारवाई करून ९६ वाहनांसह तीन कोटी ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गावठी दारु विक्री, निर्मिती, तसेच वाहतूक प्रकरणी ९२३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ८४३ जणांना अटक करण्यात आली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डाॅ. सुहास दिवसे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथके तयार करण्यात आली आहे. एक ऑक्टोबरपासून या पथकांकडून पुणे जिल्ह्यातील बेकायदा गावठी दारु विक्री प्रकरणात कारवाई करण्यात आली. गावठी दारु तयार करणाऱ्या अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. आतापर्यंत उत्पादन शुल्क विभागाकडून ९२३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ८४३ जणांना अटक करण्यात आली. गावठी दारुसह, ९६ वाहने, रसायन, तसेच अन्य कच्चा माल असा तीन कोटी ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Kalyaninagar accident case, Accused pre-arrest bail application, blood sample change case,
रक्ताचे नमुने बदल प्रकरणात आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Eknath Shinde On Ladki Bahin Yojna
Eknath Shinde : ‘लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये मिळणार, शेतकऱ्यांची कर्जमाफी, महिलांची पोलीस भरती’, मुख्यमंत्र्यांचे १० मोठी आश्वासनं
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Sharad Pawar NCP gives Tickets to Rohit Patil and Siddhi Kadam
Sharad Pawar NCP Young Candidate : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीतल्या रिंगणात उतरलेले सर्वात तरुण उमेदवार कोण?

हेही वाचा – हर्षवर्धन यांच्या चुलत बंधूंचा प्रवीण माने यांना पाठिंबा

बेकायदा दारू वाहतूक, निर्मिती प्रकरणातील आरोपींकडून बंधपत्र (बाँड) लिहून घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीबाबतची बंधपत्रे लिहून घेण्यात आली आहे. बेकायदा दारू वाहतूक, निर्मिती, तसेच निवडणुकीत मद्य वाटपाच्या तक्रारी असल्यास त्वरीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह रजपूत यांनी केले आहे.

जिल्ह्यात १८ तपासणी नाके

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात १८ तपासणी नाके उभे करण्यात आले आहेत. तपासणी नाक्यावरील कर्मचारी बेकायदा दारू वाहतुकीवर नजर ठेवणार आहेत. गोव्यातील मद्य शहरात विक्री आणल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात तीन दिवस ‘ड्राय डे’

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा ते २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अधिकृत निकाल जाहीर होईपर्यंत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, तसेच जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

हेही वाचा – काँग्रेसच्या बंडखोरांना नोटीस, शेवटची संधी; अन्यथा निलंबन करण्याचा इशारा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाकडून बेकायदा दारू विक्री, निर्मिती करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. एक ऑक्टोबरपासून विशेष मोहिम हाती घेण्यात आली असून, जिल्ह्यात १८ तपासणी नाके उभे करण्यात आले आहेत. निवडणुकीत मद्य वाटपाच्या तक्रारी आल्यास त्वरीत उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांना माहिती द्यावी. – चरणसिंह रजपूत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे

Story img Loader