पुणे : हमाल, कष्टकरी माथाडी कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी. अन्यथा राज्यभरातील कष्टकऱ्यांकडून मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी दिला.

महामंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी डॉ. आढाव बोलत होते. मुंबईत चार महिन्यापूर्वी केलेल्या बेमुदत उपोषणावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही. माथाडी कायद्याची राज्यात अंमलबजावणी न झाल्याने राज्यातील हमाल कष्टकऱ्यांना पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल. सरकारने परिणामाना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असे डाॅ. आढाव यांनी सांगितले.

हेही वाचा : देहूत पोलिसांची करडी नजर; पालखी सोहळ्यात चोरट्यांवर असणार पोलिसांचं विशेष लक्ष; पोलीस आयुक्तांनी दिली भेट

महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे, उपाध्यक्ष राजकुमार घायाळ, विकास मगदूम, सहचिटणीस अप्पा खताळ, हनुमंत बहिरट, शिवाजी शिंदे, संतोष नांगरे, गोरख मेंगडे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते. यावेळी जिल्हास्तरीय माथाडी मंडळे शंभर टक्के ठप्प झाली असून, कायदेशीर प्रश्न मार्गी लावले जात नसल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांनी बैठकीत केल्या.

Story img Loader