पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील ९६ आधार केंद्र चालकांनी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया – यूआयडीएआय) देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन न केल्याने संबंधितांचे आधारची कामे करण्याचे परवाने गोठविण्यात आले होते. तसेच त्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देऊन परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये ८२ केंद्रचालक परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, यूआयडीएआयकडून या ८२ केंद्र चालकांना आधारची कामे करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील ९६ आधार केंद्रे अद्यापही बंदच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, बँक, नोकरी, शिक्षण, व्यवसायासह केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. आधारमधील पत्ता, नाव, वय, लिंग, छायाचित्र आदींमधील बदल करायचा असल्यास आधार अद्ययावतीकरण किंवा नव्याने आधार नोंदणी करण्याबाबत यूआयडीआयकडून सातत्याने मार्गदर्शक सूचना प्राप्त होत असतात. त्यानुसार आधार नोंदणी, अद्ययावतीकरण करताना यंत्रचालकांनी ग्राहकांकडून कागदपत्रे घेणे आणि ती यूआयडीएआयच्या संगणकप्रणालीत अपलोड करणे अपेक्षित असते. मात्र, पुणे, पिंपरी चिंचवड आणि उर्वरीत ग्रामीण भागातील ९६ आधार केंद्रचालकांकडून यूआयडीएआयच्या सूचनांचे पालन वारंवार केले जात नाही, म्हणून त्यांचे परवाने तात्पुरते काढून घेण्यात आले होते. तसेच संबंधित यंत्रचालकांना जिल्हा प्रशासनाकडून प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऑनलाइन चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये ८२ केंद्रचालक उत्तीर्ण झाले. या केंद्रचालकांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी यूआयडीएआयशी पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, अद्यापही या यंत्रचालकांना पुन्हा सेवेत घेण्यात आलेले नाही. त्यामुळे ही केंद्र बंद असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा >>>पुणे : पतीच्या अंगावर ओतले उकळते पाणी…’हे’ कारण

हेही वाचा >>>प्रवास यातना! गळक्या गाड्या, झुरळे अन् अस्वच्छतेने रेल्वे प्रवासी हैराण

जिह्यातील ८६ केंद्रचालक युआयडीएआयच्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात यावे म्हणून जून महिन्यातच यूआयडीएआयला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. अद्याप युआयडीएआयकडून कोणत्याही प्रकारचे आदेश आलेले नाहीत. शहरासह ग्रामीण भागातील ९६ आधारकेंद्रे बंद आहेत. यूआयडीएआयला पुन्हा पत्र पाठवून ही केंद्रे तातडीने सुरू करण्याचा प्रयत्न आहे.- ज्योती कदम, निवासी उपजिल्हाधिकारी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 96 aadhaar centers in pune pimpri chinchwad closed pune print news psg 17 amy
Show comments