पुणे : राज्यातील धरणांमध्ये रविवारअखेर (११ ऑगस्ट) ९६५.३२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. राज्यातील प्रमुख मोठ्या, मध्यम आणि लहान धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १४३०.६३ टीएमसी इतकी असून, धरणांत ६७.५० टक्के पाणीसाठा झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता हरिश्चंद्र चकोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील प्रमुख धरणांची (साठवण क्षमतेनुसार) एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे १४३०.६३ टीएमसी इतकी आहे. त्यापैकी ९६५.३२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हा पाणीसाठी सरासरी ६७.५० टक्के इतका आहे.

हेही वाचा – पुण्यात मनोज जरांगे पाटील यांच्या जनजागृती आणि शांतता रॅलीला सुरुवात

पुणे विभागातील धरणांची पाणी साठवण क्षमता ५३७.२८ टीएमसी असून, धरणांत ८३ टक्के म्हणजे, ४४६.०४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाणीसाठ्याबाबत पुणे विभाग राज्यात आघाडीवर आहे. कोकण विभागाची एकूण पाणी साठवण १३०.८४ टीएमसी असून, पाणीसाठा सुमारे ८९.२६ टक्के, म्हणजे ११६.७७ टीएमसी इतका झाला आहे. नाशिक विभागाची एकूण पाणी साठवण क्षमता २०९.६१ टीएमसी असून, पाणीसाठा ६१.४२ टक्के, म्हणजे १२८.७५ टीएमसी इतका झाला आहे. मराठवाडा विभागाची एकूण पाणी साठवण क्षमता २५६.४५ टीएमसी असून, धरणांतील पाणीसाठा जेमतेम २६.४५ टक्क्यांवर गेला आहे. धरणांतील पाणीसाठा ६७.८१ टीएमसी झाला आहे. अमरावती विभागातील धरणांची पाणीसाठवण क्षमता १३६.७५ टीएमसी आहे. धरणांत सुमारे ६३.८४ टक्के म्हणजे ८३.९१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. नागपूर विभागातील धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १६२.७० टीएमसी आहे. धरणांत ७५.०२ टक्के, म्हणजे १२२.०३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

हेही वाचा – मागणी वाढल्याने भेंडी, गवार, फ्लॉवर, वांगी, मटारच्या दरात वाढ

विभागनिहाय पाणीसाठा

(टीएमसी आणि कंसात टक्केवारी)

कोकण – ११६.७७ (८९.२६)
नाशिक – १२८.७५ (६१.४२)
मराठवाडा – ६७.८१ (२६.४५)
पुणे – ४४६.०४ (८३.०६)
अमरावती – ८३.९१ (६२.८४)
नागपूर – १२२.०३ (७५.०२)
एकूण – ९६५.३२ (६७.५०)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 965 32 tmc water storage in dams in maharashtra know how much water storage in which section pune print news dbj 20 ssb