पुणे : सात दशकांनी राजधानीमध्ये होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास उपस्थित राहू इच्छिणाऱ्या साहित्य रसिकांना दीड हजार रुपयांमध्ये दिल्लीवारी घडविण्यात येणार आहे. संमेलनासाठी मंजूर झालेल्या विशेष रेल्वेला तिकीट दरामध्ये कोणतीही सवलत मिळणार नसली तरी मराठीप्रेमी प्रायोजकांच्या देणगीतून तिकीट दरातील तूट भरून काढण्यात येणार आहे.
या संमेलनासाठी दिल्लीला येणाऱ्या महाराष्ट्रातील साहित्य रसिकांसाठी एका विशेष रेल्वेची मागणी सरहद संस्थेने केली होती. केंद्रीय राज्यमंत्री आणि संमेलनाचे सरकार्यवाह मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नाने रेल्वे मंत्रालयाने महाकुंभ आणि इतर अडचणी असतानाही ही रेल्वे मंजूर केली. यामध्ये सवलत देण्याबाबत स्वागताध्यक्ष शरद पवार आणि मोहोळ आग्रही आहे. रेल्वे मंत्रालयाने सवलत न देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला असल्याने दिल्लीला येणाऱ्या साहित्य रसिकांची अडचण होऊ नये यासाठी दीड हजार रुपये भरून रेल्वे प्रवासासाठी नोंदणी करण्याचा निर्णय संयोजन संस्था आणि महामंडळाने घेतला आहे.
हेही वाचा :म्हाळुंगेत स्टील कंपनीतील व्यवस्थापकावर गोळीबार; हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दहा पथके
रेल्वे मंत्रालयाने कोणत्याही प्रकारची सवलत देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दीड हजार रुपये भरून रेल्वे प्रवासासाठी नोंदणी करण्याचा निर्णय संयोजन संस्था आणि महामंडळाने घेतला आहे.
१७ डबे असलेली ही स्लीपर क्लास रेल्वे १९ फेब्रुवारीला पुण्यातून निघून २० फेब्रुवारीला दिल्लीला पोहोचेल
२३ फेब्रुवारीच्या रात्री परतीचा प्रवास सुरू होऊन २४ फेब्रुवारीला पुण्यात पोहोचेल.
ही विशेष रेल्वे असल्याने त्यासाठी भरावी लागणारी रक्कम सामान्य तिकिटीच्या तीनपट आहे.
हेही वाचा :चिकुनगुनियाच्या धोक्यात वाढ; राज्यभरात रुग्णसंख्येत दुपटीने वाढ
नोंदणी ठिकाण
दिल्ली येथील साहित्य संमेलनाला जाऊ इच्छिणाऱ्यांनी सरहद, पुणे कार्यालय, सर्व्हे क्र. ६, धनकवडी पुणे ४११०४३ किंवा महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता, पुणे ४११०३० येथे नोंदणी करावी. ज्यांना प्रत्यक्ष येणे शक्य होणार नाही, अशा साहित्यप्रेमींना ७३९८९८९८५६ किंवा ८४८४०५५२५२ या मोबाइल क्रमांकावर नोंदणी करता येईल.