पुणे : आगामी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होणार आहे. त्यामुळे या संमेलनात मराठी भाषेला अभिजात दर्जा प्रदान केला जाणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आगामी साहित्य संमेलनासाठी सात ठिकाणाहून निमंत्रण प्राप्त झाली होती. साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने मुंबई, दिल्ली आणि इचलकरंजी या तीन ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. स्थळ निवड समितीने सादर केलेल्या अहवालावर साहित्य महामंडळाच्या मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत चर्चा होऊन आगामी साहित्य संमेलन दिल्लीला घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ज्येष्ठ गांधीवादी समाजसेविका शोभना रानडे यांचे निधन

साहित्य महामंडळाच्या या निर्णयामुळे सात दशकांनंतर राजधानी दिल्ली येथे साहित्य संमेलन होणार आहे. यापूर्वी १९५४ मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन झाले होते. त्यामुळे तब्बल सत्तर वर्षांनी पुन्हा एकदा मराठी भाषेचा डंका दिल्लीत वाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.