पुण्यात एक अत्यंत संतापजनक अशी घटना घडली आहे, एका १४ वर्षीय मुलीवर आठ जणांनी बलात्कार केल्याची घटना घडली असून, पीडित मुलीवर उपचार सुरू असल्याचे वानवडी पोलिसांकडून सांगण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशन येथे गेली होती. तेव्हा तेथील एका रिक्षाचालकाने तिला विश्वासात घेत रिक्षात बसवलं आणि नंतर थेट एका खोलीत घेऊन गेला. तिथे तिच्यावर आठ जणांनी बलात्कार केला. त्यामध्ये सहा रिक्षाचालक आणि दोघे रेल्वेमधील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. या घटनेची माहिती मिळताच,आम्ही रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे, आठही आरोपींना काही तासात ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
Maharashtra | Eight persons including an auto-rickshaw driver arrested in connection with the alleged abduction and gangrape of a 14-year-old girl in Pune. The condition of the girl is stable: Police
— ANI (@ANI) September 6, 2021
या सर्व आरोपींना न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच पीडित मुलीला रूग्णालयात दाखल केले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत आणि तिची तब्येत स्थिर असल्याचे वानवडी पोलिसानी सांगितले.